बच्चू कडू यांना अटक; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी मुंबईतील गिरगाव न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर विविध राजकीय आंदोलनांप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. त्याप्रकरणी त्यांनी गिरगाव न्यायालयात (Girgaon Court) जामीन अर्ज केला होता.

त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळत त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार व महाविकास सरकारमधील माजी मंत्री बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अटकपूर्व जामीन अर्ज करत बच्चू कडू यांनी आपल्या बचावासाठी धावपळ कली होती. पण गिरगाव न्यायालयाने (Girgaon Court) त्यांच्या अर्जावर न्याय करत त्यांचा अर्ज फेटाळला आहे.

त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी लाभली आहे. राजकीय आंदोलनाप्रकरणी बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच न्यायालयाने कडू यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावला होता. बच्चू कडू आज न्यायालयासमोर हजर झाले. त्यावेळी त्यांनी जामीनासाठी अर्ज केला आणि तो न्यायालयाने फेटाळला.

त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने आता त्यांना पुढील 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रहावे लागणार आहे. ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत.

महत्वाच्या बातम्या –

दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

वेदांता फॉक्सकॉन गेल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंतप्रधानांना फोन, म्हणाले…

उत्तर प्रदेशात भाषणादरम्यान अमित शहांची जीभ घसरली, म्हणाले…

दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; खाद्यतेलांच्या किंमतीत घट, जाणून घ्या सविस्तर वृत्त

मविआचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात शिंदे सरकारचा मोठा निर्णय; देशमुखांच्या अडचणी वाढल्या