अमरावती | विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरु करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय होईल, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून व आवश्यक संसाधनांचा उपयोग करुन शाळा सुरु करण्याबाबत शिक्षण परिषदेच्या सूचनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अवगत केले जाईल व विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल,असं बच्चू कडू यांनी म्हटलं.
ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देणे शहराच्या ठिकाणी शक्य आहे. परंतू ग्रामीण भागात शेतकरी, मजूर वर्गाच्या पाल्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान व स्मार्ट फोन आदींची अडचण आहे. त्यामुळे शैक्षणिक विषमताही निर्माण होता कामा नये. त्यामुळे शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी सर्व शाळा सुरु करण्याचे नियोजन आहे, असं त्यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शाळा कशा सुरु करता येईल, कोविड आजाराबाबत सर्व प्रतिबंध, दक्षतेचे नियम पाळून विद्यार्थ्यांना शिक्षण कसे देता येईल, यासाठी शिक्षण विभागाद्वारे धोरणात्मक निर्णय घेऊन प्रयत्न करण्यात येईल, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-मंत्री आदित्य ठाकरेंकडून पर्यावरण खात्यासंबंधी मोठा बदल!
-महसूलमंत्री थोरात यांचा राज्यातल्या जनतेला करासंबंधी मोठा दिलासा
-येत्या ४८ तासात महाराष्ट्रातील ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
-छत्रपतींनी घालून दिलेला आदर्श सदैव प्रेरणा देत राहिल- अजित पवार
-“लॉकडाऊनबाबत नियोजन नव्हतं, त्याचेच परिणाम आज देश भोगत आहे”