“…तर धैर्यवर्धन पुंडकरांच्या घरासमोर हात कलम करेन”

मुंबई | शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर रस्ते निधीबाबत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.

बच्चू कडू यानी बनावट दस्ताऐवज बनवून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर शासकीय निधी वळता करुन घेत अपहार केला, असा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलाय. याबाबतची सविस्तर माहिती राज्यपाल कोश्यारी यांना देण्यात आली आहे.

संबंधित कागदपत्रे तपासल्यानंतर आता राज्यपालांनी बच्चू कडू यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून तक्रार करण्यात आलेल्या रस्त्याची बच्चू कडू यांनी आज पाहणी केलीय. अकोट तालुक्यातील कुटासा ते कावसा असा हा रस्ता आहे. यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी धैर्यवर्धन पुंडकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

पुंडकर यांना वेगळ्या चष्म्याची गरज आहे. पुंडकरांनी बाळापूर येथील पंचशिल संस्था हडप केलीय. ते वंचित सोबत राहून दलितांवर अन्याय करतात. वंचितच्या गृहमंत्र्याला बाहेर काढा, असा खोचक सल्लाही बच्चू कडू यांनी प्रकाश आंबेडकरांना दिलाय. तसंच मी एक रुपया जरी खाल्ला असेल तर धैर्यवर्धन पुंडकर यांच्या घरासमोर हात कलम करेल, असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणात तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांचंही नाव समोर आलं आहे. काही इतर जिल्हा मार्ग आणि ग्राम मार्ग हे शासन क्रमांक नसलेल्या रस्त्यांच्या कामाची यादी जिल्हा परिषदेला पाठवून बच्चू कडू यांनी सरकारी निधीचा अपहार केल्याचं समोर आलं.

याबाबतचे पुरावे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी समोर आणले. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत राज्यपालांची भेट घेत योग्य कारवाईची मागणी केलीये.

महत्वाच्या बातम्या- 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकार लवकरच ‘हा’ निर्णय घेणार 

“अजूनही वेळ गेली नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचार करावा” 

समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?- भगतसिंह कोश्यारी 

रशिया-युक्रेन युद्धावर आठवलेंची कविता, म्हणाले ‘पुतीनचा बिघडला आहे ब्रेन म्हणून…’ 

मोठी बातमी ! माजी क्रिकेटर विनोद कांबळीला अटक