रस्त्यावर मोर्चे काढता मग कॅबीनेट बैठकीत काय झोपा काढता काय??- बच्चू कडू

पुणे |  सरकारमध्ये सहभागी असूनही आंदोलन करणाऱ्या आणि मोर्चे काढणाऱ्या शिवसेनेला आमदार बच्चू कडू यांनी चांगलंच लक्ष्य केलं आहे. रस्त्यावर मोर्चे काढता मग कॅबीनेट बैठकीत काय झोपा काढता काय?? अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

बच्चू कडू पुण्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.

राज्यातील शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे अजूनही मिळालेले नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यावर काहीही उपाययोजना करताना दिसून येत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

विम्याचे कृषीमंत्र्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना किती पैसे मिळाले हे एकदा तपासून पाहिले पाहिजे, अशी टीका त्यांनी केली तसेच विमा कंपन्या लुटायलाच बसल्या आहेत, असं म्हणत त्यांनी विमा कंपन्यांनादेखील लक्ष्य केलं.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचं मी स्वागत करतो. बरं झालं एसीच्या बाहेर तो निघाला आहे. पण त्याच्या अंगाला माती लागली तर तो खरा शिवसैनिक ठरेल, असं म्हणत त्यांनी आदित्य यांना टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या-

-शिवसेनेने विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला अन् शेतकऱ्यांना पैसे मिळू लागले- आदित्य ठाकरे

-शिवसेनेकडे बोलायची खुमखुमी असणारे नेते जास्त आहेत; मुख्यमंत्रीपदावरून फडणवीसांचा निशाणा

-मी अशा ठिकाणी जन्मलोय जिथली भाषा तुम्हाला कळत नाही- रावसाहेब दानवे

-‘मिशन वेस्ट इंडिज’! ‘या’ 15 जणांची भारतीय संघासाठी निवड

-…तर काँग्रेस राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत 10-10 जागा मिळतील- चंद्रकांत पाटील