भ्रष्टाचार करणाऱ्यांचे हात तोडावे लागतील- बच्चू कडू

पुणे | मी नेहमी पहातोय शाळेत जाणाऱ्यांची संख्या कमी अन् मंदिर, मस्जिदमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढत चाललीय, शहिदांच्या स्थळी जाणारे लोक फार कमी दिसतात, पण जिथे आशीर्वाद मिळतो तिथं अधिक लोक हजेरी लावतात, असं राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले आहेत.

तुम्ही आम्ही जर मनात आणलं तर जेवढ्या मंदिर अन् मस्जिद आहेत तेवढ्याच भक्कम शाळा आपण उभारू शकतो, पण तुमच्या आणि आमच्या डोक्यातून जात आणि धर्म जात नाही. तुम्ही परंपरेनं ग्रासून गेलेले लोक आहात. जेवढ्या येरझाऱ्या आपण मंदिर आणि मस्जिदमध्ये मारतो तेवढ्या येरझाऱ्या जर गावातल्या लोकांनी शाळेत टाकायला सुरूवात केली तर चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही असं बच्चू कडू म्हणाले.

आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या वाभळेवाडी शाळेला बच्चू कडूंनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. मला गावकऱ्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवाव्या वाटतात, ज्यांनी शाळेसाठी वर्गणी गोळा केली, जमिनी दिल्या अन् ही शाळा बांधली, असं ते म्हणाले आहेत.

शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे पण वाघीणीच्या दूधात आता पाणी किती आलं हे तपासण्याची गरज आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचा हात तोडावे लागतील कारण शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य त्यावर अवलंबून आहे, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-अरे देवा…यांनी तर तुम्हालाही रांगेत उभं केलं; प्रकाश राज यांची टीका

-महिला दिनी जयंत पाटील फेसबुक लाईव्हद्वारे करणार कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा गौरव

-“मुख्यमंत्रीसाहेब, बारामतीकरांची तमा न बाळगता पंढरपूर-फलटण रेल्वे मार्गाला निधी द्या”

-महिला दिनी राज ठाकरेंच्या खास शैलीत शुभेच्छा

-राज ठाकरे वर्धापनदिनी घेणार ‘हा’ मोठा निर्णय!