मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारात कोणतंही खातं मिळालं तर मी चांगलं काम करुन दाखवेन. गावात कोण सरपंचपद सोडत नाही, माझ्याही मनात मंत्री होण्याची इच्छा आहे, असं वक्तव्य प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केलं आहे.
आम्हाला मंत्रिपद मिळाल्याने जर लोकांचं भलं होत असेल तर काय हरकत आहे. पण मंत्रिपद मिळून सुद्धा शेतकऱ्यांचं, मजुरांचं, अपंगांचं भलं होत नसेल तर असं मंत्रिपद काय कामाचं, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत. ते पत्रकारांशी बोलत होते.
मलाही मंत्रिपदाची अपेक्षा आहे, पण ती लोकांसाठी काही करता यावं यासाठी आहे. सरकारची धोरणं आणि जनतेचं हित यामध्ये समानता असायला हवी, असंही ते म्हणाले आहेत. गुरुवारी पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात आघाडीच्या सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
दरम्यान, आज महाविकास आघाडीसाठी महत्तावाचा दिवस आहे. कारण आज आघाडीला विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“माझ्या स्टाईलने मी या सरकारवर तुटून पडल्याशिवाय राहणार नाही” – https://t.co/pjQQS21vza @MeNarayanRane @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है…- संजय राऊत – https://t.co/iqO5IeKRzo @rautsanjay61 @BJP4Maharashtra @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019
कुटुंबासाठी महापालिकेकडून मिळणारी गाडी महापौरांनी नाकारली!- https://t.co/yWJf6v8qqq @KishoriPednekar
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) November 30, 2019