मुंबई | प्रहार संघटनेचे प्रमुख आणि महाविकास आघाडीतील राज्यमंत्री बच्चू कडू लोकांमध्ये मिसळणारे आणि लोकांसोबत काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. अशातच बच्चू कडू यांनी सर्वसामान्यांप्रमाणे मुंबईत लोकलने प्रवास केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
मुंबईची लाईफलाईन लोकल, लोकल थांबली तर मुंबई देखील थांबली. काळानुरूप लोकल आपले रुप बदलवत आहे आता एसी सुविधा लोकलमध्ये उपलब्ध आहे. आज कामानिमित्त चर्चेगेट ते नालासोपारा लोकलचा प्रवास…, असं ट्विट बच्चू कडू यांनी केलं आहे.
मुंबईची लाईफलाईन लोकल असली तरी लोकलला प्रचंड गर्दी असते. अशातच बच्चू कडूंनी लोकलमध्ये प्रवास करुन गर्दीचा अनुभव घेतला. तसेच त्यांनी सफरीचा आनंदही लुटला.
दरम्यान, बच्चू कडू हे शेतकऱ्यांचा आवाज उठवणारे नेते म्हणून ओळखले जातात. ते अचलपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. तसेच शिवसेनेनं त्यांना राज्यमंत्री पदाची संधी दिली आहे.
मुंबईची लाईफलाईन लोकल, लोकल थांबली तर मुंबई देखील थांबली. काळानुरूप लोकल आपले रुप बदलवत आहे आता एसी सुविधा लोकलमध्ये उपलब्ध आहे. आज कामानिमीत्त चर्चेगेट ते नालासोपारा लोकलचा प्रवास… pic.twitter.com/T1U35A2wDj
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) February 28, 2020
महत्वाच्या बातम्या-
-विरोधक सीएएचं राजकारण करून दंगली घडवून आणतायत- अमित शहा
-अखेर केजरीवालांची मंजुरी; कन्हैया कुमारविरुद्ध देशद्रोहाचा चालणार खटला
-मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं तर…- देवेंद्र फडणवीस
-मुस्लीम आरक्षणासंदर्भात बोलताना बोळासाहेब थोरात म्हणतात…
-राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ही 2 नावं निश्चित; या बड्या नेत्याला डच्चू?