आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर दिवशी नेमकं काय घडलं?, धक्कादायक खुलासा समोर!

Badlapur | बदलापूर (Badlapur) प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा तळोजा कारागृहातून बाहेर पडल्यावर एन्काऊंटर झाला होता. या प्रकरणात न्यायालयीन चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. आता या समितीने आपला अहवाल सादर केला असून पाच पोलीस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांची स्वसंरक्षणार्थ गोळीबाराची भूमिका संशयास्पद असल्याचे समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

एन्काऊंटर दिवशी नक्की काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेला (Badlapur) रिमांडसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू होती. तळोजा कारागृहातून त्याला गाडीमध्ये बसवण्यात आले. त्यावेळी 2 अधिकारी (Officers) आणि 2 अंमलदार (Constables) गाडीमध्ये होते. पण 18 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर मुंब्रा बायपासजवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे याने एपीआय (API) निलेश मोरे (Nilesh More) यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर खेचली आणि समोर बसलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर 3 गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायाला लागली आणि दोन गोळ्या हुकल्या. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले, असा जबाब पोलिसांनी दिला होता.

पोलिसांच्या भूमिकेवर संशय

दरम्यान, एपीआय निलेश मोरे यांनी यावेळी स्वतःला सावरत अक्षय शिंदेच्या हल्ल्याला उत्तर दिले आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या. हा सर्व प्रकार पोलिसांच्या गाडीमध्येच घडला. घटनेनंतर निलेश मोरे आणि अक्षय शिंदे या दोघांनाही कळवा येथील शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नियंत्रण कक्षाला माहिती कळविण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र, आता पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

News Title : badlapur news what happened on encounter day