Badlapur | बदलापूर (Badlapur) येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करणाऱ्या अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या पोलीस एन्काऊंटरबाबत (Police Encounter) खळबळजनक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत (Fake Encounter) झाल्याचा अहवाल सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सादर करण्यात आला. न्यायमूर्ती (Justice) रेवती मोहिते डेरे (Revati Mohite Dere) यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे.
फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक माहिती-
अक्षय शिंदेवरील चौकशी अहवालात बंदुकीवर अक्षयचे ठसे आढळले नाहीत, असे फॉरेन्सिक अहवालात म्हटले आहे. यावरून एन्काऊंटर बनावट असल्याचा संशय बळावला आहे. पाच पोलीस अधिकाऱ्यां विरुद्ध फौजदारी खटला चालवला जाणार आहे. मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला.
अक्षय शिंदेला दुसऱ्या प्रकरणात तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटेत एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. अक्षयने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ केलेल्या कारवाईत अक्षय मारला गेला, असा पोलिसांचा दावा होता.
- संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवा धक्कादायक दावा, दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्रात…
- हनिमूनच्या दिवशी मला मित्रासोबत झोपायला… करिश्मा कपूरच्या खुलाशाने बॉलिवूड हादरलं!
न्यायालयाने पोलिसांचा दावा फेटाळला
“स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला हे पोलिसांचे म्हणणे पटणारे नाही. हे संशयास्पद आहे,” असे न्यायालयीन चौकशीच्या अहवालात म्हटले आहे. यावरून, पोलिसांनी केलेला एन्काऊंटर बनावट असल्याचा संशय बळावला आहे.
सरकारी वकिलांचे आश्वासन-
कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली. या निकालानंतर आता पाचही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.