‘बहु हमारी रजनीकांत’ फेम ‘या’ अभिनेत्रीच्या आईचं निधन, शेअर केली भावनिक पोस्ट

मुंबई| गेल्या काही महिन्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतू फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतं आहे. देशभरात करोना माहामारीचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. या आजाराने बर्‍याच लोकांचा बळी घेतला आहे .

‘बहु हमारी रजनीकांत’ फेम अभिनेत्री रिद्धिमा पंडित हिच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वृत्तानुसार त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते.

रिद्धिमाच्या आईला मूत्रपिंडाच्या आजार होता. कोरोनाची लागण होण्यापूर्वी पर्यंत त्या ठीक होत्या. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

रिद्धिमाच्या आई 68 वर्षांच्या होत्या. त्या अनेक वर्षांपासून किडनीच्या समस्येने त्रस्त होत्या. आपल्या आईला गमावल्याचं दुःख तिने एका पोस्टमधून व्यक्त केलं आहे. अशा परिस्थितीत तिने लिहीलेली पोस्ट खूपच भावूक आहे.

रिद्धिमानं पोस्ट शेअर करत म्हटलं की, “मम्मा, मॉम्झी, छोटी बेबी, अशीच मी तुला हाक मारायचे. मी तुला खूप जास्त मिस करत आहे पण मला तुझ्या अस्तित्वाची जाणीव आहे. तुझ्यासोबतच घालवलेला प्रत्येक क्षण तू आमच्यासाठी मागे सोडला आहेस. तुझं संपूर्ण आयुष्य तू आमच्यासाठी वेचलंस. त्यासाठी तुझे आभार.”

रिद्धिमा पुढे लिहिते, “मी आता माझ्या मित्रमैत्रिणींना हे सांगू शकणार नाही की आईने बनवलेलं गुजराती जेवण पाठवतेय…मी कधी तुझ्याकडून स्वयंपाकही नाही शिकले. कुणास ठाऊक माझी मुलं आता काय खातील? पण मी मात्र स्वतःला अजूनही लहान मूलच समजते. हा विचारही करवत नाही की आता मी तुझ्या हातची चव चाखू शकणार नाही.”

रिद्धीमा येथेच थांबली नाही, तिने पुढे लिहिले की, ‘तुझे नाव माझ्या फोनवर कधी फ्लॅश होणार नाही. मी औषधोपचार न घेतल्यावर किंवा योग्यवेळी  खाण्याबद्दल कधीही तू ओरडणार नाहीस या गोष्टीचा मला खूप त्रास होत आहे. तु आयुष्यातील शेवटची पाच वर्षे माझ्यासाठी जगलीस. स्वतःला त्रास होत असतानाही आयुष्यातली शेवटची पाच वर्षे तू फक्त माझ्यासाठी जगलीस.

मला माहित आहे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की तुझं सगळं दुःख, सगळा त्रास आता संपला. मी तुला तिथे वर चमकताना पाहू शकत आहे. आम्हा सर्वांना तुझा आशिर्वाद सदैव लाभो. आता काहीच त्रास नाही. फक्त आराम. मला माहित आहे तू सदैव माझ्या सोबत असशील.”

रिद्धिमाच्या भावूक करणाऱ्या या पोस्टवर तिच्या अनेक मित्रांनी आणि सहकलाकारांनी सांत्वनपर कमेंट्स केल्या आहेत. तिच्या चाहत्यांनीही तिचं सांत्वन केलं आहे.

‘बहु हमारी रजनीकांत’ शिवाय रिद्धिमाने ‘ये के हुआ ब्रो’, ‘हम: आय अॅम बिकॉज ऑफ अस’ या वेब सीरिजमध्येही झळकली आहे. ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी’च्या 9 व्या सीझनची ती सेकंड रनरअप ठरली होती. याशिवाय ‘खतरा खतरा खतरा’ या विनोदी मालिकेतही रिद्धिमाने काम केले होते.

 

महत्वाच्या बातम्या – 

ऐकावं ते नवलंच! एका झुरळामुळे इंजिनिअर पतीने पत्नीला मागितला…

थरकाप उडवणारं सत्य! ‘या’ बड्या अभिनेत्रीच्या मृत्युनंतर सेटवर घडायच्या भयानक गोष्टी; वाचा सविस्तर

घाई करा! येत्या काही दिवसांत आणखी वाढू शकतो सोन्या-चांदीचा दर; वाचा आजचे दर

बाबो! ‘या’ ड्रायव्हरनं असं काही केलं की गेंड्यानं गाडीला दणादण आदळलं; पाहा व्हिडीओ

‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राच्या ‘या’ लूकवर चाहते घायाळ, पाहा व्हायरल फोटो