मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा तडाखा बसला. गेल्या शतकातील सर्वात मोठा महापूर असल्याचं म्हटलं जात आहे. या दोन्ही जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं आहे. पुरग्रस्तांना संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. स्वयंसेवी संस्था, सोशल मीडियावरचे अनेक जण मदतीचा हात पुढे करत आहेत. आता भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यानेही मदतीचा हात पुढे केला आहे.
अजिंक्य रहाणेनं ट्विटरवरं म्हटलं आहे की, आपल्याला माहित असेलच… महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे. आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा, असं आवाहन रहाणेनं केलं आहे.
मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक तारे-तारकांनी पूरग्रस्तांना मदत केली आहे. त्यामध्ये सई ताम्हणकर, सुभोध भावे, संतोष जुवेकर त्यासोबतच प्रवीण तरडे यांनीही मदत केली आहे. चंदेरी दुनियेतील महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेले स्टार त्यांना कर्मभुमीचा विसर पडला की काय?? अशी जोरदार टीका मनसेने केली आहे.
आपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करून माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा.
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) August 12, 2019
महत्वाच्या बातम्या-
-“तुमच्याकडे जय श्रीराम, तर आमच्याकडे सिताराम”
-बीग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकलेंना मिळाली नियमभंगाची शिक्षा
-काश्मीरच्या राज्यपालांनी दिलेलं ‘ते’ आव्हान राहुल गांधींनी स्विकारलं
-“राहुल, सोनिया गांधी स्वत:च्या स्वार्थासाठी काम करतात आणि कॅमेरासमोर येऊन रडतात”
-पश्चिम महाराष्ट्र पूरात असताना मुख्यमंत्री ‘महाजनादेश’ यात्रेत मग्न- प्रकाश आंबेडकर