मुंबई | भाजपचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी देशातील सर्व राजकीय पक्ष संपून फक्त आम्हीच शिल्लक रहाणार असे बिहारमधील भाषणात म्हटले होते. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका केली जात होती.
त्यांनी आपण शिवसेना संपविली असे देखील म्हंटले होते. त्यामुळे एकेकाळी एकत्र काम केलेल्या पक्षाबद्दल असा मानस असल्यामुळे शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना काही आठवणी सांगत समाचार घेतला.
ज्यावेळी 2002 साली गुजरात दंगली (2002 Gujrat Riots) सुरु होत्या, त्यावेळी जगभरातून गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची शी थू होत होती. त्यांच्याच पक्षातील लोक त्यांना राजधर्माची आठवण करुन देत होते. त्यावेेळी बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) त्यांची बाजू घेतली होती.
नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरुन हटवू नका, असे बाळासाहेब ठाकरे सांगत होते. त्याच नेत्याच्या पक्षाला संपवण्याची भाषा आज भाजप आणि त्यांचे नेते करत आहेत. त्यामुळे नड्डा सध्या कोणत्या हवेत आहेत, असा प्रश्न ठाकरे यांनी विचारला.
गुजरात दंगलीत नरेंद्र मोदी आणि त्यावेळची संबंधित राजकारणी बराच काळ तडीपारी आणि खटल्यांमध्ये अडकले होते. नानावटी आयोगाने (Nanavati Commission) अलिकडेच नरेंद्र मोदींना क्लीन चिट (Clean Chit) दिली होती.
नड्डा हे हुकुमशहांच्या चेल्यांची भाषा बोलतात आणि ती घराणेशाहीपेक्षा घातक आहे. आज जसे नड्डा यांना वाटत आहे, तसेच एकेकाळी काँग्रेस (Indian National Congress) पक्षाला वाटत होते. आज त्यांची अवस्था काय आहे?, असे ठाकरे म्हणाले.
1978 साली बलाढ्य इंदिरा गांधींचा (Indira Gandhi) पराभव करत जनता पक्षाचे (Janta Dal) सरकार आले होते. त्यांचे पुढे काय झाले? भाजप पक्ष देखील पालापाचोळ्यासारखा उडून गेला होता. अयोध्या आंदोलन आणि लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांच्या रथयात्रेने त्यांना तारले.
हिंदू मुसलमानात दरी निर्माण करायची, लोकात धार्मिक वाद लावायचे आणि निवडणुकांच्या ऐनभरात लोकांच्यात दरी निर्माण करुन त्या जिंकायच्या हे भाजपचे धोरण आहे. याचा अर्थ मुकाबला करण्यास कोणीच उरले नाही आणि प्रादेशिक पक्षांचे पतन झाले असे होत नाही, असे ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
उर्फीने कपड्यांऐवजी गुंडाळल्या तारा, पाहा व्हिडीओ
मनसेचे शिंदे गटावर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
“त्या तीन पक्षांची स्थिती म्हणजे म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा”
‘दगड मारुन पळून जाण्यात मर्दुमकी नाही’, सामंतांवरील हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे संतापले