गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांचं बाळा नांदगावकरांना आवाहन

मुंबई : राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘EDiots Hitler’ असं लिहिलेले टी-शर्ट घातले आहे. हेच टी-शर्ट घातल्यामुळे संदीप देशपांडे पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. मनसे कार्यकर्त्यांना राज ठाकरेंनीही शांततेटं आवाहन केलं आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. 

एकंदर सर्व परिस्थिती शांततेने पार पाडावी, अशी विनंती गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी बाळा नांदगावकर यांच्याकडे केली आहे. शांततेचं आवाहन पक्षप्रमुखांनी केलं असल्याचं नांगगावकरांनी त्यांना सांगितलं आहे.

राजकारण फार टीकत नाही. बहु भी कभी सास बनती है, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे कोहिनूर प्रकरणी चौकशीसाठी आज ईडीच्या कार्यालयात हजर राहणार आहेत. यावर नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. 

दादरमध्ये जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आले आहेत. चार पेक्षा जास्त लोकांना जमण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. 

मुंबईसह पुण्यातही खबरदारी म्हणून पुणे पोलिसांनी रात्री मनसेच्या पदाधिकाऱ्यांना तसेच कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. पुणे पोलिसांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना मुंबईकडे जाणार आहे का??, असंही विचारण्यात आलं आहे. 

दरम्यान, पुण्यातील मसनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईकडे जाणार नसल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. मात्र राज ठाकरेंवर प्रेम करणारे कार्यकर्ते मुंबईकडे जाण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

-राज ठाकरेंची आज ईडीकडून चौकशी; संभाव्य आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त

-पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

-मुख्यमंत्र्यांनी काम केलंय तर महाजनादेश यात्रा काढण्याची गरजच काय?; धनंजय मुंडेंची सडकून टीका

-यु ब्रॉडबॅन्डची इंटरनेट सेवा… पुणेकर म्हणतात नको रे देवा….!