मुंबई | राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप… टीकाटिप्पण्या चालू झाल्यात. भाजप सातत्याने विरोधी पक्षांतले आमदार निवडणुकीच्या तोंडावर आमच्या पक्षात प्रवेश करणार असल्याचं वक्तव्य करत आहे. यालाच काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काँग्रेसचा काळ कठीण आहे हे निश्चित मला मान्य आहे. पण भाजपवाले याचाच फायदा घेण्याची इर्षा बाळगून आहेत. वातावरण कसं खराब होईल हेच ते सातत्याने पाहत आहेत आणि म्हणूनच भाजपातले वरिष्ठ नेते सारखे म्हणतायेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार आमच्या पक्षात येणार आहेत, असं प्रत्युत्तर थोरात यांनी भाजपला दिलं आहे.
याआधीच्या काळात जेव्हा जेव्हा काँग्रेसवर संकटं आली… काहीजणांनी काँग्रेसचा हात सोडला… पण त्याकाळातसुद्धा काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता आणि नेता खचला नाही. तर मोठ्या जिद्दीनेे आणि मोठ्या उमेदीने कामाला लागला आणि त्याने यश मिळवलं… मला विश्वास आहे त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत होईल, असा विश्वास थोरातांनी व्यक्त केला.
भाजपने ‘अब की बार 220 पार’ अशी घोषणा दिली आहे. साहजिक आहे राजकीय पक्ष आहे म्हटल्यावर ते वेगवेगळ्या घोषणा देऊ शकतात पण पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नक्कीच आघाडीचाच असणार, असंही सांगायला थोरात विसरले नाहीत.
कठीण काळात जेव्हा नेते सोडून जातात तेव्हा तरूण नेतृत्वाला अधिक संधी असते. त्याच संधीचा फायदा सध्याचं तरूण नेतृत्व घेईन असा मला विश्वास आहे, असंंही थोरांनी म्हटलं
दरम्यान, लोकसभेला आम्ही वंचितला सोबत घेतलं नाही म्हणून आम्हाला 9 जागा गमवाव्या लागल्या आहेत. मात्र विधानसभेला आम्ही वंचितसह मनसेला देखील सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असंही थोरातांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या-