महाराष्ट्र मुंबई

बाळासाहेब ठाकरेंची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी व्हावी; शिवसेनेची मागणी

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

राष्ट्रीय पुरुष, थोर नेत्यांची जयंती, पुण्यतिथीबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा समावेश करावा यासाठी पालिका सभागृहात ठराव मांडण्याची तयारी शिवसेना नगरसेवकाने केली आहे. 

बाळासाहेब ठाकरेंच्या 46वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक राजकीय नेते घडवले. विरोधी पक्षांमध्येही त्यांच्याबद्दल आदर आहे. निवडणुक न लढवताही त्यांनी राजकारणात अधिराज्य गाजवलं. राज्य सरकारने महापुरुष, थोर नेत्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याबाबत नोहेंबर 2015 साली परिपत्रक जारी केलं आहे. 

राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात बाळासाहेबांच्या नावाचा समावेश केलेला नाही. त्यामुळं त्यांच्या नावाचा समावेश करावा आणि त्यांची जयंती, पुण्यतिथी शासन पातळीवर साजरी करावी, अशी मागणी नगरसेवक किरण लांडगे यांनी केली आहे. 

भावी पिढीला बाळासाहेब ठाकरेंची महती समजावी यासाठी त्यांची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी होणं गरजेचं आहे. म्हणून किरण लांडगे यांनी शिवसेनाप्रमुखांचं नाव परिपत्रकात समाविष्ट करण्याच्या ठरावाची सूचना सभागृहात सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. 

ठरावाची सूचना सभागृहात मंजूर झाली तर आयुक्तांद्वारे अभिप्राय देऊन ती सूचना नगरविकास खात्याकडे पाठवली जाईल. 

महत्वाच्या बातम्या-

-“युतीचा विचार सोडून निवडणुकीच्या तयारीला लागा”

-डिस्चार्ज दिलेल्या रूग्णाच्या पायात 2 इंचाची काच; मनसेने उघडकीस आणला हॉस्पिटलचा प्रताप

“काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात; लवकरच पक्षात प्रवेश करतील”

“अजित पवार यांना माझं कालही आव्हान होतं… आजही आहे… अन् उद्याही राहणार”

अजित पवार घरभेदी; स्वतःच्या दिवट्यासाठी पवार साहेबांनाही अव्हेरलं!

IMPIMP