मुंबई | शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झालं. त्या 84 वर्षांच्या होत्या.
सकाळच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली असून पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
संजीवनी करंदीकर या आमच्या आत्या होत्याच, पण प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या व शिवसेनाप्रमुखांच्या भगिनी होत्या. त्यांना एक समृद्ध वारसा लाभला आणि त्यांनी तो शेवटपर्यंत जपला, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
संजूआत्या म्हणून त्या ठाकरे कुटुंबात प्रख्यात होत्या. प्रबोधनकारांप्रमाणेच त्या परखड होत्या. वाचनाचा छंदही अफाट होता. प्रबोधनकारांच्या अनेक गोष्टी त्या आम्हाला सांगत होत्या, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
संजीवनी करंदीकर यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 38 वर्षे त्यांनी मशीन सेक्शन अधिकारी म्हणून काम केलं.
महत्त्वाच्या बातम्या-
पुतिन पुन्हा एकदा भडकले?; आता रशियाने ‘या’ देशाला धमकावलं
मोठी बातमी! नवाब मलिकांना सत्र न्यायालयाकडून दिलासा
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
‘लक्षात ठेवा त्याच कबरीमध्ये तुम्हाला जावं लागेल’; एमआयएमविरोधात शिवसेना आक्रमक
मोठी बातमी! पुणे रेल्वे स्थानकावर बाॅम्ब सदृश्य वस्तू