फडणवीस दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात, राज्यात अस्थिरता पसरवण्याचा डाव- बाळासाहेब थोरात

मुंबई | एकीकडे भाजपचे नेते राजकारण करायचे नाही, म्हणून सांगत आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्लीतील काही नेते सातत्याने सरकार अडचणीत कसे येईल, हे पाहत आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

आज राज्यावर संकट आले असताना त्याला सामोरे जायचे सोडून भाजप राजकारण करु पाहत आहे. भाजपची कृती ही महाराष्ट्रद्रोही आहे. महाराष्ट्र बचाव नव्हे तर भाजप बचाव अशी त्यांची भूमिका असल्याची टीका थोरात यांनी केला.

राज्य कोरोनाच्या संकटात असताना भाजपला राजकारण सुचत आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याचा दिलेला सल्ला या कटाचा भाग आहे, असंही थोरात म्हणाले.

दरम्यान, राज्यात कोरोना येऊन  60 दिवस झाले तरी राज्य सरकारने आणखी काही केलं नाही. त्यामुळे येत्या 22 तारखेला महाराष्ट्र बचाव आंदोलन करून आम्ही सरकारला जाब विचारणार असल्याचं बाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना, त्यावर निलेश राणेंची खोचक टिप्पणी

-राज्यासाठी नेमकं काय करतोय याचं जरा आत्मपरिक्षण करा; रोहित पवारांचा फडणवीसांना सल्ला

-लोकांमध्ये विश्वास निर्माण करा, मंत्री अधिकाऱ्यांना कामाला लावा; पवारांचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र

-‘खोटं बोलू नका’; काँग्रेसच्या त्या ट्विटवर अनुपम खेर संतापले

-लॉकडाउनचा नियम मोडला; ‘या’ भाजप आमदारावर दुसऱ्यांदा गुन्हा दाखल