नाशिक महाराष्ट्र

एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये येतील; ‘या’ नेत्याचा दावा!

नाशिक |  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीला भगदाडं पडत आहेत. या दोन्हीही पक्षांतली गळती काही थांबायचं नाव घेत नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे नाराज काही नाराज नेते आणि ज्येष्ठ नेते काँग्रेसमध्ये येतील, असा दावा केला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

भाजपमध्ये इन्कमिंग जोरात वाढलं आहे. राधाकृष्ण विखे, रणजितसिंह मोहिते, रणजितसिंह निंबाळकर, भारती पवार हे बडे नेते भाजपात डेरेदाखल झालेत. यामुळेच भाजपचा एक गट नाराज आहे. आणि त्यांच्यातीलच काही नाराज नेते काँग्रेसमध्ये येतील, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

भाजप हा राजकीय पक्ष नसून सत्तेची भूक असलेला बकासूर आहे. त्यांची भूक भागत नाही, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी भाजपवर तोफ डागली. भाजपच्या या भूकेमुळं आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळं त्यांच्याच पक्षातील एकनाथ खडसेंसारखे नेते दु:खी आहेत. हेच दु:खी नेते लवकरच आमच्याकडे येतील, असा विश्वास थोरातांनी व्यक्त केला. 

काँग्रेसमधून लोकं बाहेर पडतात ही गोष्ट खरी आहे. पण नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि यातूनच काँग्रेसला पालवी फुटेल, असं थोरात म्हणाले.

पक्षाचे संघर्षाचे दिवस आहेत. संघर्षाच्या काळात कोण काय करतो याकडे माझे संपूर्ण लक्ष आहे. पक्षासाठी झटणाऱ्यांना आणि निष्ठेने काम करणाऱ्यांचा भविष्यकाळ चांगला असेल, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

दरम्यान, वंचितबरोबर आमची चर्चा चालू आहे. लवकरच आम्ही चर्चेतू मार्ग काढू, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-या कारणामुळे चित्रा वाघ यांची ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ला सोडचिठ्ठी???

-राणा जगजितसिंह पवारांना धक्का देणार??; राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडणार!

-राष्ट्रवादीला खिंडार; चित्रा वाघ ‘या’ दिवशी भाजपात प्रवेश करणार???

-सत्तेत आलो तर भूमिपुत्रांना नोकरीत 75% आरक्षण देणार; अजित पवारांचं मोठं आश्वासन

-मोदी लाटेत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या ‘या’ महिला आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश???

 

IMPIMP