नाशिक महाराष्ट्र

“भाजपचा बकासूर झालाय…भूकच भागत नाही”

नाशिक : कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात भाजपने आपली ताकद दाखवत सत्ता प्रस्थापित केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. 

भाजप हा राजकीय पक्ष नसून सत्तेची भूक असलेला बकासूर आहे. त्याची भूक भागत नाही, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी भाजपवर तोफ डागली आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपच्या या भूकेमुळं आणि फोडाफोडीच्या राजकारणामुळं त्यांच्याच पक्षातील एकनाथ खडसेंसारखे नेते दु:खी आहेत. हेच दु:खी नेते लवकरच आमच्याकडे येतील, असा विश्वासही थोरातांनी व्यक्त केला आहे. 

भाजपला सत्तेची हाव आहे. त्यातून महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात भाजपकडून फोडाफोडी सुरु आहे. छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार आहेत या अफवा आहेत, असंही बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केलं आहे. 

भाजपची प्रचार यंत्रणा पक्षप्रवेशाच्या खोट्या बातम्या पसरवत आहे, ती त्यांची रणनीती आहे, असा आरोपही थोरातांनी भाजपवर केला आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीची आम्ही जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्व गटा-तटांना सोबत घेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न सुरु आहे, असंही थोरातांनी सांगितलं आहे. 

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीशी आमची चर्चा सुरु असल्याचंही थोरातांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-30 वर्षांचा अनुभव पणाला लावणार; पण विधानसभेला ‘इतक्या’ जागा जिंकणार- अजित पवार

-मराठा मोर्चा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला जामीन मंजूर

-मुलाखत घ्यायला अजित पवार सोलापूरात गेले अन् राष्ट्रवादीचे 2 आमदारच गायब झाले!

-शरद पवार कुठं भेटले तर हात जोडून माफी मागेल आणि ते मला….- सचिन अहिर

‘पार्थ इज बॅक’! विधानसभेसाठी ‘ही’ महत्वाची जबाबदारी उचलायला सज्ज

IMPIMP