अर्थव्यवस्थेवरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची केंद्र सरकारवर सडकून टीका

मुंबई |  शुक्रवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात देशाचा जीडीपी दर 6 ते 6.5 टक्के राहिल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र मोदी सरकारचं 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था हे स्वप्न एवढ्यात काही पूर्ण होणार नसल्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.

देशात बेरोजगारी गेल्या 45 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. तरूणांना गोली मारो असे सांगून हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करणा-या अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी या आकडेवारीकडे पहावे, असा सल्ला थोरात यांनी ठाकूर यांना दिला आहे.

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे, अशी टीका करत त्यावर उपाययोजना करण्याऐवजी विभाजनवादी #CAA #NRC जनतेवर लादण्याचा प्रयत्न मोदींकडून सुरु आहे, असंही थोरात म्हणाले आहेत. उद्योगधंदे बंद होत आहेत. बेरोजगारी गेल्या 45 वर्षातील उचांकी पातळीवर पोहोचली आहे, अशी चिंताही थोरात यांनी व्यक्त केलीये.

दरम्यान, आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी सरकारने त्वरीत सुधारणांसाठी पावलं उचलण्याची गरज आहे, असं आज मांडलेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात म्हटलं आहे.

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या-