विजय वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्यात थोरातांना यश

नवी दिल्ली | काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना यश आलं आहे. बाळासाहेब थोरात यांनी विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी बोलणी करुन दिली त्यामुळे आता वडेट्टीवारांनी आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे.

वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्यासाठी बाळासाहेब थोरातांनीच पुढाकार घेतला होता. सोनिया गांधींसोबत वडेट्टीवारांचं नेमकं काय बोलणं झालं, विजय वडेट्टीवार यांना नेमकं कोणतं आश्वासन देण्यात आलं. हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

विजय वडेट्टीवार महाविकास आघाडीच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहिले नव्हते. बुधवारी विधीमंडळाचं विशेष अधिवेशनात बोलवण्यात आलं होतं. त्या अधिवेशनालाही वडेट्टीवार हजर नव्हते. यावरून त्यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिलेला ‘ब 1’ हा वडेट्टीवारांचा आवडीचा बंगला देऊनही विजय वडेट्टीवार यांची समजूत काढण्यात आली. मात्र तरीही वडेट्टीवारांची नाराजी कायम होती.

महत्वाच्या बातम्या-