“तीन पक्षांचं सरकार असलं तरी…”, मुख्यमंत्र्यांच्या भेटीआधी बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | सध्या महाविकास आघाडीत काँग्रेस सरकार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे आज काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे.

शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची भेट संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातंय.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठीची निवडणूक पहिल्याच आठवड्यात होणार आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

या बैठकीत बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नाना पटोले सहभागी होणार असल्याचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

जरी सरकार एका पक्षाचं असलं तरी अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मुख्यमंत्र्यांना ते सोडवावे लागतात. आज तीन पक्षांचं सरकार असताना काही प्रश्न नक्कीच आहेत. ते आम्ही सोडवून घेणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं आहे.

काँग्रेससोबत दुजाभाव केला जात आहे का? असं विचारण्यात आलं होतं, तेव्हा ते म्हणाले की, मी असं काहीच म्हणत नाही. मात्र प्रश्न आहेत हे आम्ही मान्य करतो. ते प्रश्न सोडवले जातील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राजकारण हे कुटुंबातील मुलांपर्यंत पोहोचलेलं जनतेला कधीच पटणार नाही. संजय राऊतांचा राग असाच आहे. महाविकास आघाडी टिकू नये यासाठीच हे प्रयत्न सुरू आहेत, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

दरम्यान, 10 मार्च रोजी राज्यात बदल होणार असल्याचं नाना पटोले यांनी सांगितलं. राज्यात नक्की काय बदल होणार आहेत? याकडे सर्व राज्याचं लक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

तो बँजो वाजवत राहिला अन् शिकारी कोल्हा फक्त ऐकतच राहिला; तुफान शेअर होतोय व्हिडीओ

स्वप्न भंगलं अन् चौफेर फटकेबाजी करणारा MR 360 भर मैदानात ढसाढसा रडला!

किरीट सोमय्यांना अटक होणार?, संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

तरूणांना नोकरीची सुवर्णसंधी; ‘ही’ दिग्गज IT कंपनी देणार 55 हजार जणांना नोकरी

तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स