…म्हणून बाळासाहेब कायम स्मरणात राहतील- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची (Balasaheb Thackeray )आज 96 वी जयंती आहे. या निमित्तानं दादर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर फुलांनी सजावट करण्यात आली आहे.

विविध राजकीय पक्षांचे नेते सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेबांना आदरांजली वाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे व त्यांच्या नेतृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सदैव जनतेच्या पाठीशी उभा राहणारा उत्कृष्ट नेता म्हणून बाळासाहेब कायम स्मरणात राहतील, अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

बाळासाहेब आणि मोदींचं नातं जिव्हाळ्याचं राहिलं. गुजरातमध्ये दंगली उसळल्या तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी मोदींच्या मुख्यमंत्रिपदावर टांगती तलवार होती.

मोदींना हटवण्याची तयारी पक्षनेतृत्वाने केली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हे मोदींच्या पाठीशी उभे राहिले होते. मोदींना हटवले तर गुजरात हातचे जाईल, असं त्यांनी भाजप नेतृत्वाला सांगितलं होतं.

मोदींनीही नेहमीच बाळासाहेबांचा आदर केला. मातोश्री निवासस्थानीही मोदी बाळासाहेबांच्या भेटीला आले होते. तसेच वेळोवेळी मोदींनी जाहीरपणे बाळासाहेबांच्या नेतृत्वाबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही बाळासाहेबांच्या स्मृतींना वंदन केलं. ‘हिंदुहृदयसम्राट श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी सादर नमन, असं ट्वीट गडकरी यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

“बाळासाहेब असते तर विरोधकांची कावकाव, चिवचिव, फडफड, तडफड थंड पडली असती” 

”आम्हाला बाळासाहेब भेटल्यासारखे वाटेल, आमचा भाऊ आम्हाला भेटणार” 

पोलिसांसाठी महत्वाची बातमी; इतकी मोठी पगारकपात होणार 

Omicron च्या BA.2 स्ट्रेनमुळे शास्त्रज्ञ चिंतेत; दिला ‘हा’ गंभीर इशारा 

हैराण करणारी बातमी समोर; 5 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू पण….