‘एकही आमदार शिवसेनेतून फुटला तर त्याला रस्त्यात तुडवा’; बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

मुंबई | अखेर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. 33 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी मोठ्या बंदोबस्तामध्ये मध्यरात्रीच सुरत सोडलं आहे. आपण आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.

एकनाथ शिंदेच्या बंडामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. काही शिवसैनिकांनी वर्षा बंगल्यावर धाव घेत एकनाथ शिंदेंविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनीही समोर येऊन त्यांना धीर धरण्याचा सल्ला दिला.

सोशल मीडियावरही एकनाथ शिदेंच्या अकाऊंटवर विविध नाराजीच्या प्रतिक्रिया येत आहे. त्यामुळे शिंदेच्या बंडामुळे शिवसैनिक नाराज असल्याचंही दिसून येत आहे. अशात सोशल मीडियावर बाळासाहेबांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जर एकही आमदार शिवसेनेतून फुटला तर कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा, असं या व्हिडीओमध्ये बाळासाहेब म्हणत आहे. बाळासाहेब ठाकरेंचा हा जुना व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर आज संध्याकाळी शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसोबत मनमोकळेपणाने चर्चा केली. आपण एकनाथ शिंदे यांना समजवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. ते ऐकतील, असा विश्वास असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

‘अडीच वर्ष सत्तेचा मलिदा चाखणारेच आता…’, संजय राऊतांची खोचक टीका 

’24 तासांत मी तुमच्यासाठी वाईट झालो का?’, एकनाथ शिंदेंचा सवाल

“21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस की ‘वर्षा’तला शेवटचा दिवस?”, मनसेचा टोला

मोठी बातमी! एकनाथ शिंदे मंत्रीपदाचा राजीनामा देणार

‘शिवसेनेच्या आमदारांना किडनॅप करून नेलं’, संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ