बॅलेट पेपर इतिहास जमा….. ईव्हीएमवरच निवडणूक होणार- निवडणूक आयुक्त

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ही ‘ईव्हीएमवर’ नको बॅलेट पेपरवरचं घ्या अशी विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने साफ फेटाळून लावली आहे. बॅलेट पेपर हा इतिहास जमा झाला असून निवडणूक ही  ईव्हीएमवरच घेतली जाईल, असं काल मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेत आरोरा यांनी ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी निवडणुक ही ईव्हीएमवरच होईल आणि या मशीनमध्ये छेडछाड होऊ शकते हा आरोप त्यांनी फेटाळून लावला.

ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड होऊ शकतो, पण त्यात कोणत्याही प्रकारची छेडछाड होणे शक्य नाही. अगदी सर्वोच्च न्यायालयानेही त्याचा निर्वाळा दिला असल्यामुळे ईव्हीएमवर कोणत्याही प्रकारचे संशय घेता येऊ शकत नाहीत. ईव्हीएम परिपूर्ण आहे, असं अरोरा यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीच्या तारखांबाबत राजकीय पक्षांचे मतंही विचारात घेण्यात आलं आहे. मात्र आगामी सणांचा विचार करुनच निवडणूक  मतदान आणि मतमोजणीच्या तारखा घोषित करण्यात येणार असल्याचं आरोरा यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, निवडणूक ही निष्पक्ष वातावरणात पार पडावी तसेच मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त रहावी यासाठी आयोग प्रयत्नशील असल्याचंही अरोरा यांनी सांगितलं आहे.

महत्तवाच्या बातम्या –