पुणे | वारकरी सांप्रदायाचे बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींचा उल्लेख म्हातारा असा केला. अन् पुन्हा एकदा बंडा तात्यांची जीभ घसरली आहे. ते स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनी पुण्यातील खेड राजगुरूनगर येथे बोलत होते.
महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व दोन्ही तशी पक्षपाती आहेत. 1947 च्या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गानं मिळालेलं नाही. तर 1942 ला जो क्रांतीकारक अशी जी चळवळ उभी राहिली. चले जाओ.. क्विट इंडिया… त्यामध्ये गावोगावी पोलीसांचे कार्यालय, सरकारी कचेऱ्या जाळणं, रेल्वेचे रुळ उखडणं, या ज्या घटना घडत गेल्या त्याचा बोध इंग्रजांनी घेतला की आता हा देश सोडण्याशिवाय पर्याय नाही, असं बंडातात्या म्हणाले.
असं सांगितलं जातं की स्वातंत्र्यासाठी साबरमती के संत तुने कर दिया कमाल, मिली हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल. पण असं म्हणणं म्हणजे झाशीच्या राणीसह 350 क्रांतीकारकांचा अपमान आहे, असंही ते म्हणाले.
शहीद भगतसिंग यांच्या मनात महात्मा गांधींची छाप होती. गांधीजींचा अहिंसावाद त्यांच्या मनात ठसवला होता. मात्र, आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायचं आहे. पण हा भगतसिंग यांचा भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. कारण, 1922 ला एक हत्याकांड झालं. त्या हत्याकांडामध्ये त्याला समर्थन देण्यासाठी म्हणून महात्मा गांधींनी नकार दिला. त्यावेळी भगतसिंग महात्मा गांधींवर नाराज झाले, असं बंडातात्या म्हणाले.
भगतसिंहांच्या मनावर हा परिणाम झाला, की आता या म्हाताऱ्याच्या ‘या’ मार्गाने जायचं काही कारण नाही. त्यानंतर ते क्रांतिकारक बनले, असंही बंडातात्यांनी म्हटलं.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! किरीट सोमय्यांच्या ट्विटने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
“प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली तर सोनं करुन दाखवेन”
“होय, आम्ही गांधी-नेहरू घराण्याचे गुलाम आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहू”
“एक पुतिन दिल्लीत बसलेत, ते रोज आमच्यावर मिसाईल सोडताहेत”
Corona Virus | कोरोनाच्या नव्या Omicron BA-2 व्हेरिएंटचं पहिलं लक्षण समोर आलं; वेळीच व्हा सावध