“उद्धव ठाकरे पोवळा तर अजित पवार ढोवळा, ढवळ्याशेजारी पोवळा बांधला पण…”

मुंबई | राज्यातील सुपर मार्केटमध्ये आणि किराणा दुकानांमध्ये वाईनची विक्री करण्यास ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळाने परवानगी दिली आहे.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालते त्यांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

त्यामुळे आता राज्यातील अनेक भागातून सरकारच्या या निर्णयाचं स्वागत होताना दिसत आहे. तर भाजपने देखील याच मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

अशातच आता वाईन विक्री निर्णयाविरोधात ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी आंदोलन केलं आहे. वाईन विक्रीच्या विरोधात व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन केलं होतं.

त्यावेळी बंडातात्या कराडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आणि सरकारच्या या निर्णयाचा विरोध देखील केला आहे.

कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा, असं बंडातात्या कराडकर म्हणाले आहेत. पतंगराव कदम यांच्या मुलाचं निधन कसं झालं?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला आहे.

राज्य सरकारला वाईन विक्रीची धुंद चढली आहे. हे आंदोलन इथंच थांबणार नाही. आंदोलन संपूर्ण राज्यात तीव्र होणार, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

ढवळ्याशेजारी पोवळा बांधला, वाण नाही पण गुण लागला, अशी आमची म्हण आहे. अजित पवारांनी दारु विकण्याचा गुण लावला. उद्धव ठाकरे पोवळा तर अजित पवार ढोवळा, असंही बंडातात्या म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवारांनी मंदिरं खुली करायची नाहीत, असं सांगितलं होतं. आता त्यांनाचा दारू विक्रीचा गुण लागलाय, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“वा रे वा हर्बल गांजावाले नवाबसाहेब, आपली नशा सत्तेची असल्यानं बिनबुचाचं सुचतंय!”

धक्कादायक! लसीकरणानंतर वैद्यकीय शाखेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

आता सुट्टी नाय, होत्याचं नव्हतं करीन पण…- किरण माने

 मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती समोर

“वाईन दारू नसेल तर मरणाऱ्या आईला ती गंगाजळऐवजी पाजाल का?”