मुंबई | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत गुन्हा दाखल करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं EOW ला दिले आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, मधुकर चव्हाण, आनंदराव अडसूळ यांच्यासह इतर बड्या नेत्यांचा 25 हजार कोटींच्या कर्जवाटपात झालेल्या घोटाळ्यामध्ये समावेश असल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे.
बँक घोटाळ्याबाबत सुरिंदर अरोरा यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या बँकेत अजित पवार आणि जयंत पाटील हे संचालक होते. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी अरोरा यांची मागणी आहे.
संबंधित बँकेमध्ये बँकेचे नियम आणि आरबीआयच्या निर्देशांची पायमल्ली करून साखर गिरण्या, सूत गिरण्यांना कर्ज वाटप करण्यात आल्याचा ठपका नाबार्डनं ठेवला होता.
2005 ते 2010 मध्ये झालेल्या या प्रकरणांमध्ये कर्जवसुली चुकवण्यात आल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. गेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने एफआयआर दाखल न केल्याप्रकरणी सरकारला खडसावलं होतं.
दरम्यान, अजित पवारांचे निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे माणिकराव पाटील राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष असताना बहुतेक कर्ज दिले गेले. यावरून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या-
-एनएसयूआयच्या विद्यर्थ्यांनी सावरकरांच्या पुतळ्याला घातला चपलेचा हार
-नक्की काय आहे ‘मिशन टेस्ट वर्ल्ड कप’???
-‘या’ खेळाडूंना असणार इतिहास घडवण्याची संधी