शिवसेना भवन परिसरात मनसेची बॅनरबाजी, हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून डिवचलं

मुंबई | राज्याचं राजकीय वातावरण अगोदरच विविध प्रकरणांवरून तापलेलं असताना आता मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यावरून वाद सुरू आहे.

राज ठाकरेंच्या भाषणाला अगदी तासांचा अवघी शिल्लक असताना मुंबईत बॅनर वाॅर सुरू झालं आहे. मनसेसैनिकांनी मुंबईसह राज्यभरात बॅनर्स लावले आहेत.

मनसेसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात बॅनर्स लावल्यानं ठाकरे-ठाकरे वाद वाढण्याची शक्यता आहे. शिवसेना भवनाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावण्यात आले आहेत.

हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरेनंतर आता एकच कट्टर हिंदू रक्षक माननीय राज ठाकरे असा मजकूर त्या बॅनर्सवर टाकण्यात आला आहे. परिणामी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं जात असल्याची चर्चा आहे.

शिवाजी पार्कवर होत असलेल्या मनसेच्या पाडवा मेळाव्याला राज्य भरातून मनसेसैनिक जमत आहेत. मोठ्या उत्साहात राज ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी मनसेसैनिक येत आहेत.

राज्यात कोरोना नियमावलीत राज्य सरकारनं बदल केले आहेत. आता राज्यात एकही कोरोना प्रतिबंधक निर्बंध लागू नाही. परिणामी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.

शिवाजी पार्कवर तब्बल 70 हजार आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुका जवळ आल्या असताना राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण येणार याची चर्चा आहे.

दरम्यान, राज ठाकरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर देखील काहीतरी भाष्य करण्याची शक्यता आहे. तसेच राज ठाकरे आपला नियोजित अयोध्या दौरा देखील घोषित करण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 काळजी घ्या! यंदाचा मार्च महिना ठरलाय सर्वाधिक उष्ण; तब्बल 122 वर्ष जुना ‘हा’ रेकाॅर्ड मोडला

‘देशातील महागाई कमी होवो…’, म्हणत गिरीश बापटांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

“भाजपमध्ये सगळेच जवळचे, ते आमच्यासाठी गुळाचं पोतं”