‘दुसरा गाल पुढं करणं हे भीतीचं लक्षण नाही तर…’; कंगनाला मिळालं जोरदार प्रत्युत्तर

मुंबई | गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने देशाचं स्वातंत्र्य आणि महात्मा गांधीवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महात्मा गांधीवर अहिंसेच्या मंत्रावरून देखील कंगनाने टीका केली होती. त्यावरून आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

दुसरा गाल पुढे केल्यानं तुम्हाला भीक मिळते स्वातंत्र्य नाही, असं वादग्रस्त वक्तव्य कंगना राणावतने केलं होतंं. तसेच यांनी आपल्याला काय शिकवले जर एखाद्याने कानशिलात लगावली तर दुसरा गाल पुढे करा, असं कंगना म्हणाली होती.

अशापद्धतीने तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल. खरंतर असं स्वातंत्र्य मिळत नाही, त्यामुळे फक्त भीक मिळू शकते, असं बेतालपणे कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं होतं. तसेच आपल्या नेत्यांना हुशारीने निवडा असंही कंगना म्हणाली होती.

त्यावर गांधीवादी फक्त दुसरा गाल पुुढे करतात असा आरोप करणारे घाबरतात. त्यासाठी लागणारे धाडस ते समजू शकले नाही, असं प्रत्युत्तर तुषार गांधी यांनी दिलं आहे.

दुसरा गाल पुढे करणं हे भीतीचं लक्षण नसून त्यासाठी खुप धाडस असाव लागतं. त्यावेळी भारतीयांना मोठ्या प्रमाणात ते दाखवून दिलं. ते सर्व जण हिरो होते तर भित्रे लोक आपल्या डोळ्यांची पापणी न हलवता वैयक्तिक फायद्यासाठी आणि द्ययेकरिता याचना करत होते, अशी टीका तुषार गांधी यांनी केली आहे.

‘बापू भिकारी म्हणून शिक्का मारल्याचं स्वागत करतील. देशातील लोकांसाठी भीक मागायला काही हरकत नव्हती, असंही तुषार गांधी यांनी म्हटलं आहे.

ब्रिटीश पंतप्रधानांनी अर्धनग्न फकीर म्हणून हिणवल्याचंही त्यांनी कौतुक केलं होतं. परंतु शेवटी याचं फकिरासमोर संपुर्ण ब्रिटीश राजवट शरण आली, असंही तुषार गांधींनी म्हटलं आहे.

तुषार गांधी यांनी याबाबत एक लेख लिहिला आहे. लेखाचे शिर्षक त्यांनी ‘गांधींचा तिरस्कार करण्यापेक्षा दुसरा गाल पुढे करण्यासाठी जास्त धाडस लागतं”, असं दिलं आहे.

असत्य कितीही मोठ्याने ओरडलं आणि सत्याचा आवाज कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी सत्य कायम राहतं, असं तुषार गांधीनी म्हटलं आहे.

कंगनाचं वक्तव्य म्हणजे हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा अपमान आहे, असं म्हणतं तुषार गांधींनी कंगनावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला, आता आम्हीही उतरावं का?”

 “नियती माफ करणार नाही, प्रत्येक सेकंदाची किंमत भाजपला चुकवावी लागेल”

 अभिनेत्री प्रिती झिंटानं दिली गूड न्यूज! वयाच्या 46व्या वर्षी बनली जुळ्या मुलांची आई

  भर सामन्यात चहर आणि गप्टीलची नजरेची खुन्नस, पाहा व्हायरल व्हिडीओ

  “संजय राऊत यांना मी माझा पगार देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं”