बारमध्ये स्त्रियांना ‘नो शर्ट फ्री बियर’ ऑफर! मुंबईतील ‘या’ बारमधील धक्कादायक प्रकार

मुंबई | गेल्या कित्येक महिन्यांपासून कोरोनानं जगात थैमान घातलं आहे. कोरोना महामा.रीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. मात्र, लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चांगलाच फटका बसू लागला होता. यानंतर केंद्र सरकारनं नियमांमध्ये शिथिलता देत हळूहळू काही गोष्टी सुरु केल्या.

मात्र, लॉकडाऊनच्या काळात अनेक उद्योगधंद्यांना चांगला फटका बसला. लॉकडाऊननंतर व्यवसायांची उलगडलेली घडी बसवणं अनेकांना खूप अवघड गेलं. काही लोकांना या काळात न भरून येण्याजोग्या नुकसानाला देखील सामोरं जावं लागलं. कोरोनाकाळात असंच काहीसं नुकसान दारू व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचं देखील झालं होतं.

लॉकडाऊनमध्ये इतर व्यवसायांप्रमाणे बियर बार आणि दारूची दुकाने देखील बंद करण्यात आली होती. देशात अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर इतर गोष्टींबरोबर दारूची दुकाने आणि बियर बार खोलण्यास सरकारनं प्रथम प्राधान्य दिलं. यावेळी मद्यप्रेमींची या दुकानांवर मोठी झुंबड उडाली. मात्र, मुंबईतील एका बियर बारमध्ये लोकांची गर्दी खेचण्यासाठी धक्कादायक प्रकार करण्यात आला आहे.

मुंबईतील एका बारमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी धक्कादायक मार्ग अवलंबण्यात आला आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बारमध्ये विचित्र आणि अश्लील जाहिराती लावण्यात आल्या आहेत.

नवी मुंबईतील पाम बीच गॅलेरिया मॉलमधील एजेन्ट् जॅक्स बारमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

या बारमध्ये पुरुषांसाठी ‘नो शर्ट नो सर्विस’ तर महिलांसाठी ‘नो शर्ट फ्री बियर’ अशी ऑफर देण्यात आली आहे. बियर बारमधील ही ऑफर ऐकून अनेकजण चक्रावले आहेत. या ऑफरमुळे मद्यप्रेमींची जरी झुंबड उडाली असली तरी बार मालकास चांगल्याच नुकसान भरपाईस आता सामोरं जावं लागणार आहे.

या जाहिरातींबरोबरच इतरही काही जाहिराती या बारमध्ये लावण्यात आल्या आहेत. ‘अल्कोहल किल्स कोरोना’, असा दावा करणारी एक जाहिरात देखील या  बियर बारमध्ये लावण्यात आली आहे.

दरम्यान, नवी मुंबईतील या बारच्या ऑफरची परिसरात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला असला तरी अद्याप बार मालकावर कारवाई करण्यात आली नाही. बारमध्ये अशा अश्लील जाहिराती देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणार का?, हे पाहणं सध्या महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनानंतर भारतीयांमोर नविन संकट! वैज्ञानिकांनी दिला धक्कादायक इशारा

सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण! आता सुशांतच्या बहिणीच गजाआड जाणार?

पंकजा मुंडे शिवसेना नाही तर राष्ट्रवादीच्या वाटेवर? पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्यानं अनेकजण गोंधळात

सुशांत प्रकरणी दीपिकाला मोठा धक्का! ‘या’ व्यक्ती विरोधात होणार कारवाई

‘कुछ कुछ होता है’ मधील छोटा सरदार लवकरच करतोय लग्न! ‘ती’ आहे तरी कोण?