विधानसभा निवडणूक 2019

“बारामती बंद करण्याऐवजी आपल्या करमती बंद करा”

Avadhut wagh And Sharad Pawar

पुणे | राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून राज्यातील अनेक बड्या नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यावर राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अजित पवारांसह 70 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याविरोधात आज बारामती बंदची हाक देण्यात आली. त्यादरम्यान बारामती बंदवरुन भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे.

बारामती बंद करण्याऐवजी आपल्या करमती बंद करा, असं भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ म्हणाले आहेत. त्यांनी याबाबत फेसबूकवर पोस्ट केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने राज्य शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शरद पवारांसह अजित पवार आणि इतर 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

बारामतीमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. बारामतीकरांनी कडकडीत बंद पाळत शासनाचा निषेध केला.

सकाळपासून अनेकांनी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सरकार हमसे डरती है, पोलीस को आगे करती है, अशा घोषणा देत बारामतीकरांनी संताप व्यक्त केला आहे. 

महत्वाच्या बातम्या-