Top news खेळ

बेअरस्टोचं शतक हुकलं, मात्र केलाय असा पराक्रम ज्यात डेविड वॉर्नरही सहभागी!

नवी दिल्ली | २०२० च्या आयपीएल मोसमातील सामना काल पार पडला. हा सामना दुबईतील इंटरनॅशनल स्टेडियममध्ये खेळला गेला. आयपीएलमधील १३ व्या मोसमातील काल २२ वा सामना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला गेला.

सनरायजर्स हैदराबादचा फटकेबाज करणारा सलामीवीर फलंदाज जॉनी बॅरिस्टो खेळायला आला होता. या मोसमातील आयपीएलच्या २२ व्या सामन्यात जॉनी बॅरिस्टो यांचे शतक काही धावांनी हुकले.

या सामन्यात जॉनी बॅरिस्टो यांनी ५५ चेंडूत ९७ धावा केल्या. यात त्यांनी सहा षटकार आणि चार चौकार मारले. जॉनी बॅरिस्टो यांचा स्ट्राईक रेट १७६.३६ होता. किंग्ज इलेव्हन पंजाबचे गोलंदाज रवी बिष्णोई यांनी एलबीडब्ल्यू आउट केले.

जॉनी बॅरिस्टो यांनी या सामन्यात डेव्हिड वॉर्नर यांच्यासोबत १६० धावांची भागीदारी केली. धावांची एवढी भागीदारी करून संघाला अजून मजबूत केले. डेव्हिड वॉर्नर हे ५२ धावा करून आऊट झाले.

आयपीएलमधील ही ५० वी वेळ आहे, जेव्हा डेव्हिड वॉर्नर ५० धावांपेक्षा अधिक धावा केल्या आहे, हाही एक विक्रमच आहे. वॉर्नर आणि जॉनी बॅरिस्टो यांची १५० धावांपेक्षा अधिक धावा करण्याची ही दुसरी वेळ आहे.

आतापर्यंतच्या आयपीएलच्या इतिहासात असं प्रथमच घडलं आहे की, कोणत्या जोडीने १५० धावांपेक्षा अधिक धावा भागीदारी करून केल्या आहे. त्यातच दोन्ही खेळाडूंमध्ये पाचव्या वेळा शतकांची भागीदारी केली आहे.

९७ धावांवर बळी जाणारे जॉनी बॅरिस्टो हे दुसरे खेळाडू ठरले आहे. याआधी गुजरात लायन्स विरुद्ध खेळताना ९७ धावांवर रिषभ पंत यांचा बळी गेला होता. तसेच बॅरिस्टो आणि वॉर्नर यांनी सलामीवीर म्हणून या मोसमातील १००० धावा पूर्ण केल्या आहे.

१००० पेक्षा अधिक धावा पूर्ण करणारी बॅरिस्टो आणि वॉर्नर ही सातवी जोडी ठरली आहे. तसेच पहिल्या बळीसाठी त्यांनी १६० धावांची भागीदारी केली, हा विक्रम करणारी सातवी जोडी ठरली आहे. मागच्या मोसमात पहिल्या बळीसाठी तब्बल १८५ धावांची भागीदारी या जोडीने केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

निकोलस पूरनने यंदाच्या आयपीएलमध्ये केलाय असा पराक्रम, जो कुणालाही जमला नाही!

इलेक्ट्रिक कारमध्ये टाटांची बाजी; नेक्सॉननं रचला ‘हा’ सर्वात मोठा कारनामा!

लग्नाला 58 वर्षे झाल्यानंतर केले लग्नाचे फोटोशूट, कारण वाचून तुमच्या चेहऱ्यावर येईल हसू!

आर्थिक तंगीत 9 लाखाच्या हिऱ्यांची बॅग सापडली, कामगारानं जे केलं ते वाचून हैराण व्हाल!

मुकेश खन्ना यांनी अखेर ‘ते’ मोठं रहस्य उलगडलं; कपिल शर्माच्या शोमध्ये…