आयसीसीमध्ये चालणार ‘दादा’गिरी! सौरव गांगुलीच्या खांद्यावर आली ‘ही’ मोठी जबाबदारी

नवी दिल्ली | भारताला क्रिकेटची महाशक्ती म्हणून ओळखण्यात येतं. भारताच्या क्रिकेटमध्ये आक्रमकता आणण्याचं श्रेय हे भारताचा माजी कर्णधार आणि सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीला जातं.

इंग्लंडच्या भूमिवर जाऊन गांगुलीनं विजय मिळवल्यानंतर केलेला जल्लेश आजही भारताच्या क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीला गेला आहे. परिणामी सौरव गांगुलीला देशात आणि भारताबाहेरही खुप मान मिळतो.

सौरव गांगुलीला क्रिकेटमध्ये दादा या टोपण नावानं ओळखण्यात येतं. त्याच्याच नेतृत्वाखाली भारतानं पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॅाफीचं विजेतेपद पटकावलं होतं.

सध्या सौरव गांगुली हा सध्या जगातिल सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळाचा अध्यक्ष आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट मंडळ सध्या जागतिक क्रकेटवर असलेलं आपलं वर्चस्व अबाधित राखण्यावर भर देत आहे.

अशातच जागतिक क्रिकेट संघटनेनं क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुलीची निवड करत असल्याचं घोषित केलं आहे. म्हणून आयसीसीमध्ये पण दादागिरी चालणार अशी चर्चा सध्या देशभर रंगली आहे.

जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक असलेल्या आणि आता एका प्रशासकाच्या भूमिकेत असलेल्या सौरव गांगुली यांचा अनुभव आम्हाला पुढे जाण्यात उपयुक्त ठरेल, अशी आशा आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी व्यक्त केली.

गेल्या नऊ वर्षांत अनिल कुंबळे यांनी समितीचं उत्कृष्टपणे नेतृत्त्व केलं. डीआरएससारख्या निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुधारणा झाल्या. संशयास्पद गोलंदाजीच्या ऍक्शनवर पायबंद घालण्यासाठी त्यांनी एक सक्षम प्रक्रिया आणली, असंही बार्कले म्हणाले आहेत.

अनिल कुंबळे यांनी त्यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अमुलाग्र बदल केले, त्यासाठी आम्ही अनिल यांचे आभारी आहोत, अशा शब्दांत बार्कले यांनी कुंबळे यांचे आभार मानले आहे.

अनिल कुंबळे हे या पदावर तब्बल 9 वर्ष होते. भारताच्या एका दिग्गजानंतर आता दुसरा दिग्गज व्यक्ती या पदावर बसत असल्यानं हा देशासाठी मोठा सन्मान आहे.

दरम्यान, कधीकाळी भारतीय संघाचे प्रमुख आधारस्तंभ असणाऱ्या चार दिग्गजांपैकी सौरव गांगुली अध्यक्ष, राहुल द्रविड प्रशिक्षक, व्ही व्ही एस लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट समितीचे अध्यक्ष म्हणून संघासोबत जुळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “सांगे कीर्ती बापाची, तो एक मुर्ख”; नाना पटोलेंवर खोचक टीका

 संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

इंधन दरवाढीचा परिणाम आता रिक्षावरही; केली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

  ‘पार्ट टाईम मुख्यमंत्री’; भाजपच्या या टीकेवर शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

  शरद पवारांचा नवाब मलिक यांना पाठिंबा, म्हणाले…