सावधान! बुस्टर डोस देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक

मुंबई | कोरोनाचा शिरकाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाचा संसर्ग असाच वाढत राहिला तर तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. यातच लसीकरणावरही भर दिला जात आहे. लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला असला तरी कोरोनाचा आणि ओमिक्राॅनचा संसर्ग होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता बुस्टर डोस देण्याचा विचार चालला आहे.

राज्यात काल कोरोना आढावा बैठक पार पडली. यामध्ये खासगी रुग्णालयात बुस्टर डोस (Booster Dose) देण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

बुस्टर डोसविषयी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. बुस्टर डोससाठी तुम्हाला जर कोणता कॉल आला असेल तर सावधान! सध्या फसवे फोनचं प्रमाण वाढलं असून खबरदारी घेणं गरजेचं आहे.

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचं सावट कमी होत नाही. त्यामुळे सगळंच ऑनलाईन झाल्याचं चित्र आहे. सगळंच ऑनलाईन झाल्यानं नागरिकांची फसवणूकीचं प्रमाणही वाढलं आहे.

कोरोना लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्याचे सांगून तुमची वैयक्तीक माहिती घेऊन ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहे.

सरकारनं बुस्टर डोसबाबत घोषणा केली आहे. त्यानंतर फ्री बुस्टर व्हॅक्सिनेशन टेलिफोन कॉल स्कॅमला सुरुवात झाली आहे. एक काॅल येतो विश्वास बसावा म्हणून व्हॅक्सिनेशन घेतलेल्या तारखा आणि केंद्र याची खरी माहिती देतो. बुस्टर डोस देण्यात येईल असं पुढे सांगितलं जातं. मोबाईलवर एक ओटीपी येतो. काही वेळातच ओटीपी घेण्यासाठी एक कॉल येतो. हा ओटीपी देताच खात्यातून मोठी रक्कम ऑनलाईन चोरी केली जाते.

अशा खोट्या आणि फसव्या काॅलच्या आहारी न जाता खबरदारी बाळगण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यामुळे नागिरकांनी अधिक सतर्क होण्याची गरज आहे.

दरम्यान, आधार व्हेरिफिकेशनसाठी लागणारा ओटीपी विचारतात. याचा गैरवापर करून संबंधित व्यक्ती आर्थिक व्यवहार करू शकते. अशा फोन कॉल बाबत सतर्क राहा.

महत्त्वाच्या बातम्या – 

  काय सांगता! खाण्या-पिण्याची आणि झोपण्याचीही डिग्री देते ‘ही’ युनिवर्सिटी, वाचा सविस्तर

Omicron ला रोखण्यासाठी ‘हे’ औषध प्रभावशाली; तज्ज्ञांनी दिली दिलासादायक बातमी

मोठी बातमी! एसटी संप मागे घेत नसल्यानं एसटी महामंडळानं उचललं ‘हे’ महत्त्वाचं पाऊल

मुंबईत खरंच लॉकडाऊन लागणार?, एका दिवसात आढळले तब्बल ‘इतके’ रूग्ण

मनी हाईस्टच्या ‘स्टाॅकहोम’ने घरी लावली गणपतीची पेंटिंग; फोटो तुफान व्हायरल