काळजी घ्या! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत समोर आली ‘ही’ नवी लक्षणं

मुंबई| सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता अधिक असल्याचे पावलोपावली दिसून येत आहे. आता कोरोनाची नवी लक्षणं समोर येत आहेत. सर्दी-खोकला-ताप ही लक्षणं सोडून इतर काही लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर सावध राहा.

कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन सक्रिय झाल्याने, त्याची नवीन लक्षणे देखील समोर येत आहेत. या नव्या लक्षणांमध्ये काही लक्षणं ही नवीन आहेत. नवीन लक्षणांमध्ये पोटात वेदना, उलट्या होणे, सांधेदुखी, अशक्तपणा येणं, भूक न लागणे असे लक्षणं दिसत आहेत.

कोरोना आता शरीराच्या वेगवेगळ्या अंगावर परिणाम करतो आहे. विशेषतः फुफ्फुसाप्रमाणेच आतड्यांवरही परिणाम करतो आहे. त्यामुळे पोटात तीव्र वेदना होणं हे कोरोनाचं नवं लक्षण आहे. अंग दुखल्यासारखं वाटत असेल म्हणजे स्नायूंमध्ये वेदना होत असतील तर हे कोरोनाचं लक्षण आहे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, वेगवेगळे लोकांमध्ये वेगवेगळे लक्षणं दिसत आहेत. ही लक्षणे एखाद्या व्यक्तीस विषाणूच्या संसर्गाच्या 5-6 दिवसांनी दिसतात. काही प्रकरणांमध्ये ही लक्षणे 14 दिवसांपर्यंत देखील नोंदविली गेली आहेत.

पोटदुखी, उलटी, डायरिया, अंगदुखी अशी तक्रार घेऊन आलेले 40 टक्के रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

नवीन प्रकरणांबाबत भारतात केलेल्या अभ्यासानुसार बदलत्या स्ट्रेनमुळे लक्षणेही बदलत आहेत. आता फक्त ताप, थकवा किंवा कोरडा खोकला, चव आणि गंध जाणे ही कोरोनाची लक्षणे राहिलेली नाहीत.

दरम्यान, गुरूवारी दिवसभरात राज्यात तब्बल 56 हजार 286 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला  मिळालं, गुरूवारी 376 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना आज हे गंभीर चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यात सध्या एकूण 5 लाख 21 हजार 317 सक्रिय रूग्णसंख्या आहे.

महत्वाच्या बातम्या – 

मुव्ही माफियांच्या भितीनं ‘या’ अभिनेत्यानं केला…

‘या’ चित्रपट दिग्दर्शकाच्या पत्नि आणि मुलीची…

इंधन कंपन्यांच्या ‘या’ मोठ्या निर्णयाने…

‘हा’ तरुण केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेला अन् खुर्चीवर बसताच रडू लागला; पाहा मजेशीर व्हिडीओ

ऐन लग्नसराईच्या काळात सोनं 50 हजारापार जाण्याची शक्यता, वाचा आजचा दर

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy