नवीन कार खरेदी करताना ‘या’ 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा; नाहीतर पश्चाताप होईल

मुंबई |  भारत हा चारचाकी वाहनांसाठी आघाडीचा बाजार बनत आहे. देशात दैनंदिनपणे मोठ्या प्रमाणात गाड्यांची विक्री होताना दिसत आहे.

केंद्र सरकारच्या बदललेल्या वाहन धोरणामुळं देखील देशात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या खास फिचरच्या गाड्या घेऊन सहभागी होत आहेत.

नवीन आणि जुन्या गाड्या खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा मोठं नुकसान देखील होऊ शकतं.

आपल्या बजेटनूसार गाडीची निवड करणं हे सर्वात योग्य आहे. कारण बजेटच्या बाहेरील गाडी घ्यायचा विचार करत असाल तर सहाजिकच कर्ज घ्यावं लागणार.

कर्जाचा विषय आला की सर्व आर्थिक गणित कोलमडताना अनेकदा पाहायला मिळालं आहे. कार घेताना सर्व माहिती असणं  गरजेचं आहे.

कारबद्दलची सर्व माहिती आपल्याला नेटवरून अथवा कंपनीच्या वेबसाईटवरून मिळते. कार घेण्याअगोदर ती काळजीपुर्वक पाहाणं गरजेचं आहे.

आपण घेत असलेल्या कार आणि तश्याच दुसऱ्या कंपनीच्या कारमध्ये काय समान धागे आहेत याची पडताळणी करणं गरजेचं आहे. मेंटन्न्सचा खर्च किती येईल याची माहिती काढणं हे देखील महत्त्वाचं आहे.

आसन क्षमता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या परिवारातील सदस्यानूसार सोईस्कर आसन क्षमता असलेली कार निवडल्याचा फायदा होतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

 आर्चीचा फोटो पाहून परश्या दिवाना, अशी कमेंट केली की… झाले सगळेच सैराट

 नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ प्रसिद्ध IT कंपनी देणार तब्बल 60 हजार भारतीयांना नोकरी

 Deltacron: डेल्टाक्राॅनमुळं टेन्शन वाढलं! जाणून घ्या किती धोकादायक आणि काय आहेत लक्षणं?

राज्यपालांचा ठाकरे सरकारला दणका! विशेषाधिकार वापरत रद्द केला ‘तो’ मोठा निर्णय

 सर्वात मोठी बातमी; कोरोनाबाबत WHO चा जगाला अत्यंत गंभीर इशारा