मुंबई | भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सवांना प्रचंड महत्त्व आहे. सामाजिक सलोखा कायम राखण्यात महत्त्वाचा वाट उत्सवांचा असतो. आता होळीची (HOLI 2022) तयारी जोरात आहे.
भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ मानली जाते कारण भेदभाव विरहीत जीवनपद्धती आपल्याकडं प्रस्थापित झाली आहे. परिणामी सर्वत्र आनंदात सण साजरा केला जातो.
होळीचा सण अवघ्या भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पेढे, लाडू, जिलेबी, यांसारखे गोडपदार्थ सर्वत्र पहायला मिळतात.
एकमेकांना गोड पदार्थ खाऊ घालून शुभेच्छा दिल्या जातात. घरातील सर्वजण होळी साजरी करण्यात गुंतत असल्यानं सहाजिकच आपण बाहेरून गोड पदार्थ घेऊन येतो.
मार्केटमधून मिठाई घेऊन येत असाल तर काही गोष्टींची काळजी नक्की घ्या. कारण की सणाच्या काळात भेसळ असलेले खाद्यपदार्थ देखील बाजारात असतात.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ओळखीच्या दुकानदाराकडूनच मिठाई खरेदी करा. कारण आपल्याला त्याच्यावर इतरांपेक्षा अधिक विश्वास असतो.
मिठाई बनवलेली तारीख लक्ष करून पाहा. जास्तीत-जास्त 3 दिवसांपेक्षा अधिक दिवस झालेली मिठाई खरेदी करू नका. आरोग्यासाठी ते हानिकारक ठरतं.
मिठाई खाऊन पाहा, मिठाई कोणत्या जागी ठेवलेली आहे ते नक्की पाहा. व्यवस्थित जास्त सुरक्षित जागी असलेल्या मिठाईला पसंती द्या.
मिठाईमध्ये काही मिश्रण केलं असेल तर ती मिठाई घेऊ नका. कारण आरोग्यासाठी अधिक मिश्रण असलेली मिठाई घातक असते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘The Kashmir Files’वर अभिनेते नाना पाटेकर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
Stock Market: शेअर बाजारात गुंतवणूक करताय?, तुमच्या पोर्टफोलिओत ‘हे’ 5 शेअर्स आहेत का?
सर्वात मोठी बातमी; कोरोनाबाबत WHO चा जगाला अत्यंत गंभीर इशारा
अत्यंत महत्त्वाची बातमी; LPG सिलेंडरच्या दरात झाला मोठा बदल
बालात्काराचा आरोप असलेल्या शिवसेना नेत्याचे खळबळजनक कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल!