‘दाढी करा आणि जे केलंय ते निस्तरायला सुरुवात करा’ ‘या’ अभिनेत्याचा मोदींना टोला

मुंबई| देशात एकीकडे कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. तर दुसरीकडे आज देशाच्या 5 राज्यातील निवडणूकांचा निकाल. या निकालांसंदर्भात अनेकजण ट्विट करत याबद्दल आपले विचार व्यक्त करत आहेत. अभिनेत्री कंगना रणौतनंतर आता अभिनेते प्रकाश राज यांनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

प्रकाश राज यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं, ‘डन अँड डस्टेड! प्रिय सर्वोच्च नेत्यांनो, नागरिकांनी स्पष्टपणे म्हटले आहे. द्वेष आणि व्हायरस पसरवणं आता थांबवा. दाढी करा आणि तुम्ही ज्या काही चुका केल्यात त्या निस्तरायला आता सुरुवात करा. अखेर जीव महत्त्वाचा आहे’ प्रकाश राज यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

पश्चिम बंगालमधील विजयासाठी भाजपनं जोर लावला होता. भाजपच्या जागा जरी वाढताना दिसत असल्या तरी तृणमूल काँग्रेसची सत्ता कायम राहणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. ममता बॅनर्जी निवडणुकीला उभ्या असलेल्या जागेवर अनेकांचं लक्ष आहे. या ठिकाणी ममता बॅनर्जी विजयी होणार का की सुवेंदु अधिकारी ममता बॅनर्जींचा पराभव करणार हे पाहावं लागणार आहे.

पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ आणि आसाम ही चार राज्ये तसेच पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. सर्वाधिक चुरस पश्चिम बंगालमध्ये आहे. ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस सत्ता राखणार की भाजपला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रसची सत्ता कायम राहिलं असं वाटत आहे. देशभरात एकीकडे करोनाचं मोठं संकट सुरू असताना राजकीय वर्तुळात आज या निकालांची चर्चा आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

दिशा पाटणीला केलेल्या किसींग सीनविषयी सलमान खाननं सोडलं मौन,…

कोरोनाच्या नियमांचं पालन करत नवरा-नवरीनं काठीच्या सहाय्यानं…

कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्यावर अभिनेत्री झाली आनंदी,…

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ‘या’ अभिनेत्यांनं…

एक समोर, एक शेजारी मगरींनी आडवला महिलेचा रस्ता त्यानंतर जे…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy