नवी दिल्ली | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्यावर सतत टीका आणि जनतेच्या क्षोभाचा पाऊस पडत असतो.
आता त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविषयी एक वक्तव्य केले आहे. नरेंद्र मोदींच्या जादुमुळे विदेशात भारताचा (India) सन्मान वाढला आहे, असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले आहेत.
पंतप्रधान वीस-वीस तास कामे करतात. त्यामुळे आपल्या देशाला असे नेतृत्व मिळाले की ज्यांच्यामुळे विदेशातील लोक भारतीयांचा सन्माम करतात, असे देेखील राज्यापाल कोश्यारी म्हणाले.
मोदींनी देशातील नागरिकांमध्ये स्वाभिमान जागविला. त्यामुळे परदेशात भारतीयांचा गौरव होतो आहे आणि आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडते आहे. ह्या राज्यपालांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
मागील काही दिवसांत त्यांनी मुंबई (Mumbai) आणि मराठी माणसांबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मुंबईतून जर का गुजराती (Gujrati) आणि मारवाडी (Marwadi) लोक निघून गेले, तर मुंबईत पैसा शिल्लक रहाणार नाही. आणि आपोआपच मुंबईचा आर्थिक राजधानीचा (Financial Capital) दर्जा निघून जाईल, असे राज्यपाल म्हणाले होते.
या त्यांच्या दाव्यावरून त्यांच्यावर सर्वच स्तरांतून टीका झाली होती. त्यांच्या स्वपक्षाने देखील हात वर केले होते. त्यामुळे त्यांच्यावर माफी मागण्याची नामुष्की ओढविली होती.
आता त्यांनी एक नवीन वक्तव्य केले आहे. एकीकडे देशातील वाढती महागाई आणि रुपयाची घसरण यामुळे विरोधी पक्ष सध्या केंद्र सरकार आणि मोदी यांच्या धोरणांवर नाराज आहे. त्यामुळे त्यांचा नवीन दावा आता वादग्रस्त ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या –
ICICI आणि PNB बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!
मोठी बातमी! शरद पवारांपाठोपाठ अजित पवारांनाही धक्का
शिंदेंच्या बंडखोरीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी!
“मुख्यमंत्री अनेक दिवस नीट झोपलेले नाहीत, ते रात्री…”
गोपीचंद पडळकरांविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, उचललं मोठं पाऊल