मुंबई | राज्यातील राजकारण सध्या अनेक मुद्द्यांनी गाजत आहे. राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांचा कलगितुरा रंगला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत दोन दिवसीय नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी राऊत यांनी नागपूरमध्ये जाऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अनेक वक्तव्य केलेली पहायला मिळाली.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुबुद्धी आली असती, त्यांनी शिवसेनेसोबत मैत्री जपली असती तर कदाचित आज ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले असते, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
संजय राऊतांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे आरोपांचा कलगितुरा वाढत चालल्याचं पहायला मिळत आहे.
शिवसेनेनं आमच्यासोबत बेईमानी केली म्हणून आज आम्ही सत्तेपासून दूर आहोत, असा हल्लाबोल सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
2024 मध्ये भाजप कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि जनतेच्या आशीर्वादाने सत्ता येईल आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला जी स्थगिती मिळाली आहे ती 2024 मध्ये उठेल, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत आणि शिवसेनेला मी धन्यवाद देईन की जर ते मागच्या 24 ऑक्टोबर 2019 ला सोबत आले असते तर त्यांनी बेईमानी केली नसती.आता जनता बेईमानीचं उत्तर 2024 मध्ये दाखवेल, असंही सुधीर मुगंटीवार यांनी म्हटली आहे.
आज जे सरकार आहे ते सरकार आपल्या विरोधकांवर सुडबुद्धीने वागवत विरोधकांना कशा पद्धतीने संपवता येईल असा विचार असणार हे सरकार आहे. कौरवांनी लाजवं अशा पद्धतीने हे सरकार राज्यात चाललं आहे, अशा तिखट शब्दांत मुनगंटीवार यांनी टीकास्त्र सोडलं.
महत्त्वाच्या बातम्या –
“देशात सध्या एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम सुरु आहे”
Corona Update: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ‘या’ ठिकाणी पुन्हा मास्क बंधनकारक
‘शिवसेनेसोबत पंगा घेऊ नका, अन्यथा…’; संजय राऊतांचा भाजपला इशारा
आत्ताची मोठी बातमी! मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, तणावाचं वातावरण
काय सांगता! बंदुकीच्या धाकावर आमिर खानचं 70 लाखांचं घड्याळ लुटलं; CCTV फुटेज समोर