‘सेलिब्रिटी होणं इतकं सोपं नसतं’; हेमांगीनं शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

मुंबई | अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती तिचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेमांगी सोशल मीडियावर तिच्या फॅन्ससोबत संवाद साधत असते. अशातच सध्या तिच्या पोस्टनं सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

हेमांगीनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यामध्ये तीनं सेलिब्रिटी होणंही खूप अवघड असल्याचं म्हटलं आहे.

हेमांगीनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे की, जेव्हा एक हॉट मुलगा रस्ता क्रॉस करत असताना तुमच्याकडे पाहून स्माईल करतो आणि त्याचवेळी तुमच्याकडे तुमचा एक चाहता हे पाहतो.

म्हणजे सेलिब्रिटी होणंही सोपं नसतं असं हेमांगीनं म्हटलं आहे. हेमांगीनं पुढं लिहिलं आहे की, सत्य घटनेवर आधारीत.

हेमांगीचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. त्याचबरोबर या व्हिडीओवरही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहे.

दरम्यान, हेमांगीनं मराठी-हिंदी मालिका, नाटक, आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

पाहा व्हिडीओ – 

महत्त्वाच्या बातम्या – 

  ‘कुणीही कायदा हातात घेतला तर…’; गृहमंत्र्यांचा गंभीर इशारा 

  “माझ्या हत्येचे कटकारस्थान रचले जात आहे”

  “आता बाॅलिवूड, टाॅलिवूड म्हणण्याऐवजी ‘इंडियन फिल्म इंडस्ट्री’ म्हणावं” 

  Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

  अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं चित्रपटसृष्टीला ठोकला रामराम