बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय?, आणखी एक खंडणीचा धक्कादायक प्रकार समोर!

Beed News | बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. अवघ्या महाराष्ट्रात जनआक्रोश मोर्चा काढून संतोष देशमुख यांच्या न्यायाची मागणी होत असतानाच, बीड जिल्ह्यात खंडणीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात खंडणी हा आता गोरखधंदा झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काय आहे प्रकरण?

बीड (Beed News) जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच मंगल राम मामडगे यांच्याकडे त्याच गावच्या माजी सरपंचाने एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सरपंच मंगल मामडगे यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी माजी सरपंच, एक सदस्य आणि उपसरपंचाच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे, या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंच या दोन्ही पदांवर महिला आहेत. आरोपी सातत्याने विविध कारणे सांगून विकासकामांमध्ये अडथळे आणत होते आणि खोट्या तक्रारी दाखल करत होते. एवढेच नाही तर, शाळेच्या दुरुस्तीसाठी आलेल्या चार लाख रुपयांपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या, अशी मागणी आरोपींनी केल्याचा आरोप सरपंच मामडगे यांनी केला आहे. पोलिसांनी माजी सरपंच वसंत शिंदे अनिल देशमुख आणि ज्ञानोबा देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सख्ख्या भावांवर हल्ला-

दरम्यान, बीड जिल्ह्यात (Beed News) तीन सख्ख्या भावांवर त्यांच्याच समाजातील लोकांनी हल्ला केला. यामध्ये दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक भाऊ गंभीर जखमी झाला. ही दुर्दैवी घटना अंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अजय विलास भोसले आणि भरत विलास भोसले अशी मृतांची नावे आहेत. कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी आहे. या घटनेतील सात संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा खून का व कोणत्या कारणावरून केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

दुसरीकडे, खंडणीखोर वाल्मिक कराडने खंडणीच्या गुन्ह्यामध्ये केज जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जाला सीआयडीने न्यायालयात आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोक्का लागलेल्या कराडची चौकशी करायची असल्याने त्याला जामीन देऊ नये, अशी विनंती सीआयडीने न्यायालयाकडे केली होती. याच जामीन अर्जावर आज केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

News Title : Beed News demands extortion to female sarpanch

महत्त्वाच्या बातम्या-

लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच एवढे रुपये जमा होणार! आदिती तटकरेंचा मोठा खुलासा

खूशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबद्दल केंद्र सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

सैफ अली खानच नव्हे तर शाहरुख खानच्या घराची… पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट!

क्रिकेटपटू, उद्योगपती, अभिनेता…‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या अफेअरनं खळबळ!

वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, सरकारकडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई