सांगली | सांगली जिल्ह्यातील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरून वाद होताना दिसत आहे. या आहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे लोकार्पण राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते करण्याचं नियोजन आहे. मात्र, सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी जोरदार विरोध केला आहे.
पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. पापी लोकांच्या हातून स्मारकातं उद्घाटन होण्याअगोदर आम्ही मेंढपाळ समाजाच्यावतीनं उद्घाटन केलं, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.
सांगली जिल्ह्याशी कसलाही संबंध नसताना शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन नको. इतर स्थानिक नेत्यांचंही नाव वगळण्यात आल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. शरद पवारांनी पुतळ्याचं उद्घाटन करण्यात त्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
आतापर्यंत तुम्ही किती उद्घाटनं केली आहेत. कंटाळा नाही का आला?, असा खोचक सवाल सदाभाऊ खोत यांनी केला आहे. आम्ही आता सिक्सर मारणार आहोत आणि उद्घाटन करणार आहोत.
तुम्ही कितीही पोलीस बळाचा वापर केला तरी उद्घाटन होणारच आहे, अशी भूमिका गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे. आज सांगलीमध्ये पिवळे झेंडे घेऊन भाजप कार्यकर्त्यांनी पिवळे वादळ आणले आहे.
शरद पवारांनी गोरगरिबांची फसवणुक केली आहे. पुतळ्याचे लोकार्पण आमच्याकरिता ऐतिहासिक क्षण आहे. हा लोकार्पण सोहळा आमच्या मेंढपाळ्यांच्या हस्ते होणार आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले होते.
सरकार मेंढपाळांना विरोध करून पद मोठी मन छोटी याचं दर्शन घडवत आहेत. आम्ही पोलिसांना घाबरणार नाही. पोलिसांनी अडवूनही एव्हढे लोक याठिकाणी पोहोचले, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
सांगली मिरज कुपवाड महापालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे. महानगरपालिकेनं बांधलेल्या स्मारकाचे उद्घाटन करण्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण द्यायला हवं होतं, असंही गोपीचंद पडळकरांनी बोलून दाखवलं आहे.
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या हस्ते उद्घाटनास जो विरोध केला आहे, तो योग्यचं आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“द काश्मीर फाईल्ससारखे चित्रपट करमुक्त करण्याची गरज नाही”
“राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूूमिकेत तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत”
“काही नेते जात्यात, काही नेते सुपात, तर काहींचं पीठ झालंय”
“तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेत, नाहीतर ते काय देणार घंटा”
‘धोनीमुळे मी…’; विजयानंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा