Top news तंत्रज्ञान देश

भीक मागितली, झाडून घेतलं; आता 150 लोकांना काम दिले, इतक्या कोटींची कमाई!

नवी दिल्ली | लहानपण गरिबीत गेले की, जीवनातील प्रत्येक दिवस हा संघर्ष करण्यात जातो. पण रोज एका आशेने दिवस जात असतो. रोज येणाऱ्या संघर्षावर मात करण्यासाठी बळ येते आणि तेच तुम्हाला जगवत असते. ही कथा प्रत्येक पावलाच्या संघर्षाने चालू झाली. हार न मानण्याची जिद्द आणि अपमानाला सन्मानात बद्दलण्याची ही प्रेरणादायी गोष्ट रेनुका आराध्य यांची आहे. ज्यांनी गरिबी आणि संघर्ष या दोन्हीवर मात करून एक कंपनी उभी केली.

ती कंपनी आज १५० लोकांना रोजगार देत आहे. या कंपनीची वार्षिक उलाढाल ३८ कोटी आहे. बंगळुरूच्या अनेकल तालुक्यातील एका छोट्याशा गावात रेनुका यांचा जन्म झाला. रेनुका यांचे वडील पुजारी होते. त्यांच्याकडे उत्पन्नाचे काही साधन नव्हते. त्यांच्याजवळ एक एकर शेत होतं, पण त्या मातीत कोणतच पीक येत नव्हतं. यामुळेच रेनुका त्यांच्या वडिलांसोबत अन्नासाठी भिक्षा मागण्याचे काम करायचे. त्यातून जे मिळेल ते विकून कुटुंब चालत होते.

आपल्या तिन्ही भावंडांमध्ये रेनुका सर्वात लहान होते. त्यांचा मोठा भाऊ बंगळुरूला शिकायला गेला. पण रेनुका कुटुंबासोबत राहून शिकत होते. रेनुका शाळेतून आल्यावर वडिलांसोबत जाऊन भिक्षा मागायचे. १२ व्या वर्षात त्यांनी घरात मदतनीस म्हणून काम केले होते. त्यानंतर काही वर्षानंतर वडिलांनी रेनुका यांचा प्रवेश १० वीच्या वर्गात घेतला. त्यांच्याकडे फी द्यायला पैसे नव्हते, त्यामुळे शिक्षक ती फी भरायचे. त्या बदल्यात रेनुका यांच्याकडून घरातील काम करवून घ्यायचे.

त्याच दरम्यान त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, त्यामुळे त्यांना पुन्हा गावाला जावे लागले. त्यानंतर आईची आणि बहिणीची जबाबदारी त्यांच्यावर आली. मोठ्या भावाने लग्नानंतर त्यांचे कुटुंब वेगळे केले, त्यामुळे रेनुका यांना शिक्षण सोडून काम करावे लागले. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये काम केले. पण तरीही पैसे कमी पडत होते, त्यामुळे त्यांनी रात्री सुरक्षारक्षकाचे काम केले. त्यानंतर एका प्रिंटिंग सेंटरमध्ये झाडू मारण्याचे काम केले. त्यांच्या या कामाने तेथील लोक खूपच आनंदी झाले.

त्यांनी पुढील एक वर्षासाठी प्रिंटिंगमध्ये मदत करण्याचे काम दिले. ते काम सोडल्यानंतर श्याम सुंदर ट्रेडिंग कंपनीमध्ये मदतनीस म्हणून कामाला सुरवात केली. ही कंपनी बॅग आणि सुटकेस बनवून ते विकण्याचे काम करत होती. इथे ते या वस्तू लोड करण्याचे काम करत होते. १९८७ मध्ये ते विक्रेता झाले. हे काम करत असताना त्यांना स्वतःचे काही काम करण्याची संकल्पना सुचली. मग त्यांनी सुटनेस आणि व्हॅनिटी बॅगचे कव्हर बनवून शहरात सायकलवर जाऊन विकायला चालू केले.

पण हा धंदा काही जमला नाही, तिथे काही नुकसान होण्याच्या भीतीने त्यांना पुन्हा सुरक्षारक्षकाचे काम करावे लागले. रेनुका यांचे वयाच्या २० व्या वर्षी पुष्पा यांच्यासोबत लग्न झाले. पतीला साथ देण्यासाठी त्यांनी कापडाच्या कारखान्यात काम करायला सुरुवात केली. दोघे मिळून महिन्याला ६०० रुपये कमावत होते. त्यानंतर सुरक्षारक्षकाचे काम करताना त्यांना वाहन चालवण्याचा विचार मनात आला. त्यानंतर लग्नाची अंगठी विकून त्यांनी गाडी शिकली आणि वाहन परवाना काढला.

एका वाहतूक कंपनीत चालक म्हणून नोकरीस लागले. ही कंपनी मृतदेह वाहतूक करण्याचे काम करत होती. त्यानंतर एक दिवस त्यांना कामानिमित्त एका कंपनीत जावे लागले. तिथे त्यांना बाहेरच थांबावे लागले, ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली. त्यानंतर त्यांनी ठरवले की, आपणही एक कंपनी काढायची, जिथे सर्वांना सन्मान मिळेल. २००० मध्ये त्यांनी इकडून-तिकडून पैशांची सोय करून गाडी खरेदी केली. काही वर्षांनंतर त्यांनी सहा टॅक्सी आणि १२ चालक ठेवले, ते १२ तासांच्या शिफ्टमध्ये काम करत होते.

२००६ मध्ये मंदीमुळे ‘इंडियन सिटी टॅक्सी’ नावाची कंपनी विकायला काढली आहे. त्यानंतर त्यांनी सर्व टॅक्सी विकून ती कंपनी खरेदी केली. त्या कंपनीकडे ३० कॅब होत्या. त्यामुळे त्यांनी यांना ‘प्रवासी कॅब’ नावाने नोंदणी केली. त्यांचा पहिला ग्राहक अ‌ॅमेझॉन इंडिया होते. त्यानंतर काम वाढत गेल्यानंतर ३०० कॅब झाल्या. त्यांच्या ग्राहकांच्या यादीत LinkedIn, Walmart, Akamai, General Motors सारख्या दिग्गज कंपन्यांचे नाव आहे. सध्या त्यांच्या १३०० कॅब आहे आणि वार्षिक उलाढाल ३८ कोटींची आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सलमानबर काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीनं चित्रपट सृष्टीला केलं अलविदा

धक्कादायक! सुशांत प्रकरणी तपास करणाऱ्या एम्स रूग्णालयाच्या डॉक्टरांविरोधात त.क्रार दाखल!

रेखानं ‘या’ कारणाने बहिणीला चित्रपट सृष्टीत येवू दिलं नाही

यशस्वी जयस्वालच्या बॅटला बॉल लागला आणि परत आलाच नाही, कारण…

लॉकडाऊनमुळे नवऱ्याचा चांगला जॉब गेला; हार न मानता पत्नीनं निवडलं ‘हे’ काम!