मुंबई | सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात नेहमीच हमरीतुमरी पहायला मिळत असते. सध्या पाच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरुन राजकीय वर्तुळात हालचाली सुरु झाल्या आहेत.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे भाजपनं गोवा विधानसभा निवडणुकीची धुरा सोपवली आहे. त्यामुळे चांगलेच आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहेत.
गोव्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष टीएमसी, काँग्रेसला सोबत घेऊन सत्ताधारी भाजपला आव्हान देण्याच्या प्रयत्न करत आहे. यावरुनच आता देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.
हे पाहा विरोधकांचं म्हटलं तर शरद पवारांचा पक्ष असा आहे की, पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाया उसके जैसा…, मग ते कधी समाजवादी पार्टीशी चर्चा करतात, कधी काँग्रेसशी तर कधी टीएमसीशी बोलतात, असं म्हणत फडणवीसांनी शरद पवारांना लक्ष केलं आहे.
नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पुढे फडणवीसांनी म्हटलं की, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी राजकारण करायला गल्लीतच यावं लागतं, हेच अंतिम सत्य आहे साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाचं.
गोव्यात भाजप पक्ष येणार असा विश्वास दाखवत देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काॅंग्रसेवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीत कोणाची सत्ता येणार हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता गोव्यात कोणाची सत्ता येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“कंगना रणौतच्या गालापेक्षा जास्त सुंदर रस्ते बनवणार”
राजकारण तापलं: ऐन निवडणुकीच्या तोंडावर काॅंग्रेस उमेदवाराचे ‘ते’ फोटो व्हायरल
Petrol-Diesel Price: पेट्रोल- डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर