अखेर बेळगाव सीमाप्रश्न सुटणार?; 17 मार्चला होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

दिल्ली: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सीमाप्रश्नावर येत्या 17 तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बेळगाव, कारवार, निपाणीसह कर्नाटकातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात सामील व्हावा, या मागणीसाठी हा खटला दाखल करण्यात आला होता.

2004 पासून हा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दीड वर्षांपूर्वी या प्रकरणाची अखेरची सुनावणी झाली होती. त्यामुळे 17 मार्चला काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता.

डिसेंबर महिन्यात कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सीमावाद पेटला होता. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभे करुन गोळ्या घाला, असे त्यांनी म्हटले होते. हा वाद तापल्यामुळे दोन्ही राज्यातील परिवहन महामंडळाने दक्षतेचा उपाय म्हणून एसटी सेवा बंद केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-अरुणोदय झाला… राज ठाकरेंकडून गाणं ट्वीट, मनसेच्या वर्धापन दिनाची जय्यत तयारी

-अश्लील व्हिडीओ केलेले महिलांना चालतात मग…; भाजप खासदाराचे खळबळजनक वक्तव्य

-…म्हणून मी राष्ट्रवादी पक्ष सोडला- गणेश नाईक

-विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा; सावकारी कर्जही करणार ठाकरे सरकार माफ

-“चांदमियां पाटील, राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते”