मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाडवा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली. त्यावेळी त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.
राज ठाकरे यांनी हिंदूत्वाची कास धरल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळे आता राज्यात भाजप मनसे अशी नवी युती पहायला मिळण्याची शक्यता आहे.
अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले.
गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारचा पंचनामा केला. महाराष्ट्रातील वास्तववादी चित्र त्यांनी सांगितले, हे काही जणांना झोंबले आणि त्यांनी प्रतिक्रिया दिल्या, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
ज्यांनी आयुष्यभर स्वार्थी, सोयीने सत्ता मिळवली त्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया द्यावी. हे ही एक आश्चर्य आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी गद्दारी केली त्याहीपेक्षा मोठी गद्दारी हिंदुत्वाशी असल्याचा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.
पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही उत्तर दिले असले, तरी ‘गद्दारी ती गद्दारीच’. हे निष्ठेचे राजकारण नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.
पाहा ट्विट-
पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही उत्तर दिले असले, तरी ‘गद्दारी ती गद्दारीच’. हे निष्ठेचे राजकारण नाही, हे पद आणि सत्तेसाठीचे राजकारण आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) April 3, 2022
महत्त्वाच्या बातम्या-
पुढील 4 दिवस महत्त्वाचे! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
…तर चंद्रकांतदादांच्या खांद्याला खांदा लावून काम करू – संजय राऊत
सिगारेट पिणाऱ्यांनो… वेळीच व्हा सावध, नाहीतर डोळेही गमावून बसाल
“मनसे बिनबुडाची, त्यांना बुड नाही अन् शेंडाही नाही”
प्रवीण दरेकरांची तब्बल 3 तास चौकशी; बाहेर आल्यावर म्हणाले “मला भंडावून…”