अजूनही लस न घेतलेल्यांनो सावधान; अत्यंत धक्कादायक माहिती समोर

मुंबई | जगभरात सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus Pandemic) तिसऱ्या लाटेनं (Corona Third Wave) हाहाकार माजवला आहे. ओमिक्रॉन (Omicron) या अत्यंत वेगानं संसर्ग पसरवणाऱ्या नव्या प्रकारामुळे ही साथ आली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या एका दिवसात हजारोंच्या संख्येनं वाढत असून, सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय असल्याचं आरोग्य विभागामार्फत वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र तरीही अनेक लोकांनी लस घेतली नाही. अशात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2021 ते जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहर उपनगरात झालेल्या एकूण कोरोना मृत्यूंपैकी 94 टक्के रुग्णांनी लसीचा एकही डोस घेतलेला नव्हता, तर केवळ सहा टक्के रुग्ण पूर्ण लसवंत असल्याचं धक्कादायक चित्र आहे.

सध्या मुंबईत ऑक्सिजनच्या एकूण उपलब्धतेपैकी 10 टक्के ऑक्सिजनचाच वापर होत आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे.

करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण होण्याचा धोका तुलनेत कमी आहे. लस घेतलेल्या लोकांमध्ये करोनाची लागण झाली तरी त्यांच्यात फार तीव्र लक्षणे जाणवत नसल्याचंही आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितलं आहे.

ऑक्सिजनच्या वापराची, ऑक्सिजन खाटांची स्थिती काय आहे, हे महत्त्वाचं आहे. ऑक्सिजनची मागणी वाढलेली नाही. रुग्णसंख्या कमी असतानाही ऑक्सिजनचा किंवा आयसीयूचा वापर वाढला, तर निर्बंधांचा विचार करू, असंही इकबाल चहल यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, समाजातील विविध घटकांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून लस साक्षरता करण्याचा पालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. तरीही लसीविषयीची भीती काही प्रमाणात आहे, असं पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांना म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

राजेश टोपेंनी तिसऱ्या लाटेबाबत दिली महत्वाची माहिती, म्हणाले ‘जानेवारी अखेरपर्यंत ही लाट…’

“शिवसेना-भाजपमध्ये युती होईल, भाजपने मन मोठं करून…

राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत अचानक घट, मात्र धोका कायम; वाचा आजची ताजी आकडेवारी </a

 सुशिक्षित शेतकऱ्याची यशोगाथा! पेरूच्या उत्पादनातून कमावले लाखो रूपये

48 चा झाला बड्डे बाॅय ऋतिक, जाणून घ्या पिळदार शरीराचं सिक्रेट