मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची प्रतिमा खराब केली आहे; भाजपची टीका

मुंबई |  सामनाचे संपादक आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज्याची आर्थिक परिस्थिती हे मोठं आव्हान असून पैशाचं सोंग करता येत नाही, अशी हतबलता त्यांनी बोलून दाखवली. त्यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे, अशी टीका भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे.

राज्यात नवी गुंतवणूक येण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे सबळ आणि सक्षम चित्र निर्माण होणं गरजेचं असताना उद्धव ठाकरे अशी हतबलता व्यक्त करतात, हे खेदाचं आहे. 2014 साली राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर चुंबकीय शक्तीसारखे नवे उद्योग राज्यात आले त्यांनी हे मान्य केलं पण आता आलेले उद्योग गेले, असं म्हणून त्यांनी शिवसेनेकडे असलेल्या उद्योग खात्याचं अपयश मान्य केलं, असा टोलाही भांडारी यांनी लगावला.

मुख्यमंत्री या नात्याने राज्यातले प्रश्न सोडवण्याबाबत त्यांनी आग्रही भूमिका घ्यायला पाहिजे मात्र कारभार हातात घेतल्यानंतर पहिल्या दोनच महिन्यात ते हतबलता व्यक्त करत आहेत, अशी टीका भांडारी यांनी केलीये.

अवकाळी पावसाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार मिळायला पाहिजेत अशी मागणी स्वत: उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी ती मागणी पूर्ण केली नाही, यावर देखील भांडारी यांनी बोट ठेवलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-एक दिवस ओवैसी देखील हनुमान चालिसा म्हणताना दिसतील- योगी आदित्यनाथ

-उद्धवजी, काय तो निर्णय घेऊनच टाका… मी तुमच्या सोबत आहे; नितेश राणेंचं ट्वीट

-आमचा आवाज दाबणं इतकं सोप का आहे?; झायरा वसीमचा मोदींना सवाल

-उद्धवजी, पीडितेचा जीव वाचवा… तिच्यावर चांगल्या रूग्णालयात उपचार करा- चित्रा वाघ

-…अन् राज ठाकरेंनी दिलं संजय मिस्त्रींना मनसेत येण्याचं निमंत्रण!